आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागपुरात तब्बल 40 लाखांची तूरडाळ चोरीला, ट्रक चालकानेच केली चोरी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - तुरीच्या डाळीच्या किमती सध्या आवाक्‍याबाहेर गेल्‍या आहेत. त्‍यामुळे परदेशातून नागपूरमध्ये आयात केलेली 40 लाख रूपयांची तूर चक्क चोरीला गेली आहे. तूरडाळ तयार करण्‍यासाठी ही दाळ मिलमध्ये आणण्यात आली होती. तुरीची वाहतूक करणा-या ट्रकचालकानेच ही दाळ लंपास केली आहे.
सणउत्‍सवांच्‍या दिवसात आधीच महागाईला सामोरे जावे लागत आहे. त्‍यामध्‍ये तुर डाळीच्या किमती आकाशाला भिडल्‍या आहेत. उत्‍पादन कमी असल्‍याने परदेशातून तुर आयात केली जात आहे. आयात केलेली 40 लाख रुपयांची तुर ट्रक चालकानेच चोरल्‍याने नागपूरात खळबळ उडाली आहे.
एक चालक ताब्‍यात दोघे ताब्‍यात
तुरीपासून दाळ तयार करण्‍यासाठी नागपूरात मोठ्या प्रमाणात तुर आणली जाते. या चोरीच्‍या प्रकरणात मुंबईतून नागपूरमध्‍ये दाळीसाठी तुर आणण्‍यात येत होती. पण वाटेतच ट्रकचालक ट्रकमध्‍ये लावलेल्‍या कंपार्टमेंटमध्‍ये मातीतून दाळीची चोरी करत होते. या प्रकरणात एका ट्रक ड्रायव्हरला ट्रकसह अटक करण्यात आली आहे तर दोन चालक ट्रक सोडून फरार झाले आहेत. पुढील तपास पोलिस करत आहेत.