आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आधी कर्जमाफी, नंतरच चर्चा, विरोधकांचा विधानसभेत गदारोळ, कामकाज तहकूब

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - हिवाळी अधिवेशनाच्‍या दुस-या दिवशी कॉंग्रेस राष्‍ट्रवादी शेतक-यांच्‍या प्रश्‍नांसाठी रस्‍त्यावर उतरली आहे. विधानभवनाच्‍या पाय-यांवर विरोधकांनी निदर्शने करत शासनाचे लक्ष वेधण्‍याचा प्रयत्‍न केला. हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये सोमवारपासून सुरु झाले आहे. पहिल्या दिवशी संयमाची भूमिका घेणा-या विरोधकांनी दुस-या दिवसापासूनच सरकारवर हल्लाबोल सुरु केला आहे. शेतक-यांच्या आत्महत्या रोखायच्या असतील तर केवळ कर्जमाफी हाच पर्याय उरल्याचे सांगत विरोधकांनी विधिमंडळाबाहेर निदर्शने केली. सकाळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पाय-यांवर बसून निदर्शने केली. त्यानंतर विधानसभेत जाऊन अध्यक्षांच्या समोर घोषणाबाजी केली.
शेतक-यांना संपूर्ण कर्जमाफी झालीच पाहिजे, शेतक-यांना पॅकेज दिलेच पाहिजे, अशा घोषणा घेत सरकारचा निषेध नोंदवला. आपल्याला हीत असेल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतक-यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी कर्जमाफी हा एकमेव पर्याय नसल्याचे म्हटले होते. विरोधकांनी हाच मुद्दा लावून धरत कर्जमाफी हाच पर्याय असल्याचे ठासून सांगितले आहे. विधानसभेचे विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यासह माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माणिकराव ठाकरे, अजित पवार, छगन भुजबळ आदी नेते आंदोलनात सहभागी झाले होते.
सोमवारी पहिल्याच दिवशी वेगळ्या विदर्भाच्‍या मागणीवरून शिवसेना-भाजप आमने सामने आले. त्‍यानंतर राष्‍ट्रवादीने संत्राफेक आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधले. मंगळवारी कर्जमाफी, नापिकीसारख्‍या मुद्द्यावर विरोधक रस्‍त्यावर उतरले आहेत. कॉंग्रेस राष्‍ट्रवादीच्‍या नेत्‍यांनी शेतक-यांच्‍या विविध मागण्‍यांचे फलक घेऊन सकाळीच विधान भवनाच्‍या पाय-या गाठल्‍या. " बिजेपी सरकार मे गडबड झाला है, सरकार की दाल मे कुछ काला है.' असा मजकूर असलेले फलक घेऊन विरोधकांनी सरकारवर ताशेरे ओढले. सरकारने शेतक-यांला वा-यावर सोडले आहे. राज्‍यात नापिकी असल्‍याने शेतकरी चिंतेत आहे. त्‍यामुळे कर्जमाफीशिवाय पर्याय नाही. अशी मागणी विरोधकांनी केली आहे.
मंगळवारी अधिवेशनात काय ?
- अध्‍यादेश सभागृहाच्‍या पटलावर ठेवणे.
- 2015-16 च्‍या पुरवणी मागण्‍या सादर करणे.
- शासकीय विधेयके.
- सत्‍तारूढ पक्षाचा प्रस्‍ताव.
कामकाज तहकूब -
- हिवाळी अधिवेशनात विरोधकांचा प्रचंड गोंधळ, विधानसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब.
- सभापतींसमोर असलेल्या वेलमध्ये उतरले विरोधक.
- कर्जमाफीच्‍या मागणीसाठी काँग्रेस महिला आमदारांची वेलमध्ये घोषणाबाजी.
- शेतकरी अडचणीत, सरकारची मदतीची भूमिका नाही.
- केंद्राचे पथक आले, पर्यटन करून निघाले - विरोधी पक्षनेते विखे पाटील.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करून पाहा, अधिवेशनाच्‍या परिसरातील आंदोलनाचे फोटो..