आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

५ ट्रक, १०० खोकी, हजारो फायली; ६०० जणांचा ताफा व राजदंडही !

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - भटक्या जमाती आपल्या पालानिशी एका गावातून दुसरीकडे स्थलांतर करतात. हे आपण ऐकतो, पाहतो... पण अिधवेशनाच्या निमित्ताने जवळपास अख्खे विधिमंडळ आणि मंत्रालय ८०० किलोमीटर अंतर पार करून मुंबईहून उपराजधानी नागपूरला आपले बिऱ्हाड हलवते आणि पुन्हा राजधानीत परतते.विशेष म्हणजे गेली ५५ वर्षे एका साच्यात बसवल्यासारखा हा प्रवास अविरत सुरू आहे. ५ ट्रकभरून हजारो कागदपत्रे, फायली तसेच संदर्भ ग्रंथ बांधून नेणारी शंभरच्या वर खोकी, पोलिस स्क्वॉड, रेल्वे बोगी, कडक सुरक्षा व्यवस्थेतून जाणारा राजदंड आिण ६०० पेक्षा जास्त माणसे या प्रवासात असतात...

भारताच्या मध्य प्रांतामधील विदर्भ महाराष्ट्रात सामील झाले तेव्हा झालेल्या नागपूर करारानुसार राज्यातील एक हिवाळी अधिवेशन उपराजधानीत घेण्याचा निर्णय झाला आिण नागपूरला पहिले अधिवेशन झाले ते १९६० मध्ये १० नोव्हेंबर ते १६ डिसेंबरदरम्यान. १९६० पासून मुंबई ते नागपूरचा विधिमंडळाचा प्रवास आजही एका रेषेत आिण सरळ सुरू आहे तो कुठेलही विघ्न न येता !

जुलैमधील पावसाळी अधिवेशन पार पडताना िहवाळी अधिवेशनाची घोषणा होते. परिपत्रक निघाल्यानंतर सुरू होते प्रवासाची तयारी. १०० वर मोठी खोकी, ट्रंका मागवण्यापासून ते सामान वाहून नेणारे ट्रक निश्चित केले जातात. या ट्रकमधून विधिमंडळ तसेच मंत्रालयातील विभागांचे दप्तर, ग्रंथालयातील पुस्तके, संदर्भग्रंथ भरले जातात. प्रत्येक ट्रकमध्ये दोन पोलिस असतातच, पण प्रत्येक जिल्ह्यात या ट्रकना संरक्षण देणारे विशेष पोलिस स्क्वॉडही असते. एकाजिल्ह्याची सीमा पार करून ट्रक दुसऱ्या जिल्ह्यात आले की पथक बदलते. अधिवेशनकाळात महाराष्ट्र सरकारसोबत होणारा पत्रव्यवहार नागपूरच्या पत्त्यावर करावा, असेही देशातील सर्व राज्य सरकारे आणि केंद्र सरकार यांना आगाऊ सूचना देऊन कळवले जाते.
१६०/२ खोल्यांचा कुटुंबकबिला
मुंबईवरून आलेल्या विधिमंडळाच्या अिधकारी-कर्मचाऱ्यांची व्यवस्था नागपूरमधील िसव्हिल लाइनमधील सदरवर १६०/२ खोल्यांच्या गाळ्यांत केली जाते. महिनाभरापेक्षा जास्त िदवस मुक्काम असल्याने येथे पूजा, भजन, सांस्कृितक कार्यक्रम आयोजित केले जातात. गेल्यावर्षी कक्ष अिधकारी मधुकर भडेकर यांनी सहकाऱ्यांच्या साथीने केलेल्या जाखडी नृत्याने कार्यक्रमात रंगत आणली होती.
संगणकासारखे काम
गेल्या ५५ वर्षांत ट्रक, रेल्वेच्या प्रवासात दप्तरातील कागदपत्रे गहाळ होणे किंवा उशिरा पोहोचणे असे प्रकार आतापर्यंत कधी झालेले नाहीत. अगदी संगणकासारखे अचूक काम सुरू असून जणू मानवी संगणकच हे काम करत असल्याचे दिसून येते. विधानसभा अध्यक्ष, विधान परिषद सभापती, विधिमंडळाचे प्रधान सचिव यांचे मार्गदर्शन तसेच अधिकारी व कर्मचारी यांच्यातील समन्वयामुळे हा मुक्कामाचा प्रवास चोख होत आहे.
नागपूरसाठी खास ३ नवीन राजदंड
विधिमंडळाच्या कामकाजात राजदंडाला खूप महत्त्व आहे. हे राजदंड नव्हे तर मानदंड असल्याने त्यांची सुरक्षा करणे हे मोठे काम असते. विधानसभा, विधान परिषद व विशेष हक्कभंग समिती असे तीन राजदंड असून रेल्वेच्या विशेष बोगीतून बंदूकधारी सुरक्षा व्यवस्थेत ते आणले व परत नेले जातात. यासाठी तीन पोलिस तैनात तर असतातच, पण त्याचबरोबर या बोगीतून विधिमंडळाच्या मालमत्ता विभागाची ६० ते ७० माणसे आपल्या इतर कागदपत्रांसह प्रवास करत असतात. मात्र, या वर्षीपासून नागपूरसाठी खास ३ राजदंड बनवण्यात आले आहेत. त्यामुळे यापुढे मुंबईवरून राजदंड आणण्याचा द्राविडी प्राणायाम करावा लागणार नाही. त्याच्या सुरक्षेचा खर्चही कमी होईल. काहीवेळा गर्दीमुळे राजदंडाच्या विशेष बोगीत माणसे घुसत असल्याचे प्रकार याअाधी घडल्याने धक्काबुक्कीचे प्रकार झाले आहेत.