आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्याचे महाधिवक्ता श्रीहरी अणेंविरोधात निदर्शने, शिवसेनेचा हक्कभंग

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - विदर्भ राज्याच्या मागणीवर सार्वमत घेण्याची मागणी करणारे राज्याचे महाधिवक्ता श्रीहरी अणे यांच्या विरोधात शिवसेना आमदारांनी शुक्रवारीही विधिमंडळाच्या पायऱ्यांवर निदर्शने केली. तसेच शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी अणेंविरोधात हक्कभंगाची सूचना विधिमंडळ सचिवालयाच्या प्रधान सचिवांकडे दिली.

अणे यांनी नागपुरातील एका कार्यक्रमात विदर्भ राज्याच्या मागणीवर सार्वमत घेण्याची मागणी केली होती. त्याला भाजप वगळता सर्वच पक्षांनी आक्षेप घेऊन त्यांच्या हकालपट्टीची मागणी केली आहे. विधिमंडळातही त्याचे पडसाद पडत आहेत. ‘राज्याच्या महाधिवक्त्याने स्वतंत्र विदर्भाचा मनोदय व्यक्त करणे हे केव्हाही समर्थनीय नाही. त्यांचे वक्तव्य विधिमंडळाचा आणि पर्यायाने आमदारांचा अवमान करणारे आहे,’ अशी टीकाही सरनाईक यांनी केला आहे.
बातम्या आणखी आहेत...