आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिलेचे टॉवरवर शोलेस्‍टाईल आंदोलन, तासभर प्रशासनाची उडाली तारांबळ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - नागपूर हिवाळी अधिवेशन सध्‍या विविध मागण्‍यांसाठीच्‍या अनोख्‍या आंदोलनांनी गाजत आहे. विधानभवनाच्‍या परिसरात दररोज आंदोलक, मोर्चे घेऊन मोठ्या संख्‍येने दिसत आहेत. पण एका महिलेने चक्‍क बीएसएनएलच्‍या टॉवरवर चढून अनोखे आंदोलन केले आहे. नागपूरच्या तहसील कार्यालयामध्‍ये हे टॉवर आहे. आश्रम शाळेतील प्रश्‍नांसंदर्भात विविध मागण्‍या घेऊन आलेल्‍या एका महिलेने हे आंदोलन केले. चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथील सोनूबाई येवले असे या आंदोलक महिलेचे नाव असून त्‍यांनी तब्बल एक तास शोले स्टाईल आंदोलन केले.

अधिवेशन स्थळापासून हाकेच्या अंतरावर असलेल्‍या तहसील कार्यलयातील बीएसएनएल टॉवरवर ही महिला चढल्याने विधानभवनाच्‍या परिसरातील उपस्‍थितांचे लक्ष या अनोख्‍या आंदोलनाकडे वळले.

आश्रमशाळेला अनुदान मिळावे, आश्रमशाळेतील लोकांचे स्वतंत्र रेशनकार्ड तयार व्हावे, आश्रमशाळेला 99 वर्षांची लीज मिळावी अशा विविध मागण्‍या या महिलेने केल्‍या आहेत.
प्रशासनाची उडाली तारांबळ
तब्‍बल एक तास या महिलेने शोले स्‍टाईल आंदोलन केल्‍याने प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली. सोनूबाई टॉवरवर चढल्याने अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाच्‍या एका गाडीवरून काही कर्मचारी महिलेला उतरवण्यासाठी टॉवरवर चढले. काही कर्मचारी खाली जाळे घेऊन उभे होते. यावेळी तहसील कार्यलयाजवळ मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. सोनूबाईची समजूत काढण्यात आल्यानंतर त्‍या खाली उतरल्‍या.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, किती उंचावर बसली होती आंदोलक महिला..