आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संपूर्ण कर्ज माफीची घोषणा करा, विरोधकांनी आजही बंद पाडले कामकाज

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - मंगळवारी विरोधकांच्या गदारोळामुळे दिवसभरासाठी दोन्ही सभागृह तहकूब करण्यात आले होते. बुधवारीही शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर विरोधकांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर जोरदार निदर्शने केली. तिस-या दिवशी सकाळी सभागृहाचे कामकाज सुरु होताच विरोधकांनी शेतक-यांचे प्रश्‍न मांडले. चर्चा करून शेतकऱ्यांना कोणताही फायदा होणार नाही. त्यामुळे संपूर्ण कर्ज माफीची घोषणा आधी करावी, अशी भूमिका लाऊन धरत विरोधकांनी निदर्शने केली. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचा या निदर्शनात सहभाग होता.

- विरोधकांनी बुधवारी घातलेल्या गदारोडामुळे अधिवेशनाचे कामकाज उद्या पर्यंत तहकूब.

विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे -
सभागृहात चर्चा न करता अगोदर शेतकऱ्यांना कर्ज माफीची घोषणा करावी अन्यथा कामकाजावर आमचा बहिष्कार राहील.
विधीमंडळ नेते अजित पवार -
कापूस, ऊस, कांदा, केळी, संत्रा उत्पादक शेतक-यांना भरीव मदतीची गरज आहे. राज्यातील अर्थव्यवस्था कोलमडली आहे. शेतक-यांना वाचवायचे असेल तर त्यांच्या हितासाठी मदतीची घोषणा सरकारने करावी. आता 302 चा गुन्हा कुणावर दाखल करावा हे राज्य प्रमुखांनी किंवा मंत्र्यांनी सांगावे. चर्चा खूप झाली आता घोषणा हवी. तरच विधीमंडळाचे कामकाज चालू देऊ, असा इशारा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विधीमंडळ नेते अजित पवार यांनी घेतला.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करून पाहा, आंदोलनाचे फोटो..
प्रलंबित मागण्‍यांसाठी हजारो शिक्षक रस्‍त्यावर..