आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजपासून हिवाळी अधिवेशन, सरकारला दयामाया नाही, विखे पाटलांचा इशारा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - ‘शेतकरी आत्महत्येत झालेली वाढ, महागाईने पिचलेला आणि करांच्या ओझ्याखाली दबलेला सामान्य माणूस, राज्याचा कोसळलेला आर्थिक डोलारा, तूर डाळ घोटाळ्यांनी हे सरकार पोखरलेले आहे. संवेदना गमावून बसलेले हे सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरलेले आहे,’ असा आरोप करीत विरोधकांनी सत्ताधाऱ्यांच्या चहापानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतल्याची माहिती विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी रविवारी दिली. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, काँग्रेसचे गटनेते शरद रणपिसे, माजी मंत्री विजय वडेट्टीवार या वेळी उपस्थित होते.

राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सोमवारपासून नागपुरात प्रारंभ होत आहे. या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ‘आमच्या १५ वर्षांच्या सत्तेनंतर युती सरकार सत्तेत आले. फडणवीस सरकारला सत्तेवर येऊन दोन तीन महिनेच झाले होते. त्यामुळे प्रत्येक अधिवेशनात, ‘ही सर्व आघाडी सरकारची पापं आहेत. आम्ही नवीन आहोत. थोडा वेळ द्या’, असे हे सरकार सांगत होते. पण आता सरकार सत्तेवर येऊन १३ महिने झाले आहे. सरकारचा नवेपणा संपला आहे. त्यामुळे पुढच्या काळात आम्ही नवीन आहोत, हे ऐकून घेणार नाही. सभागृहात आम्ही उपस्थित केलेल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर सरकारला स्पष्टपणे द्यावे लागेल, असा इशारा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला. एलबीटी, टोलमाफीचा परतावा देण्यासाठी सरकारने करांचा बोजा वाढवला. आर्थिक नियोजनाच्या अभावामुळे अर्थव्यवस्था खिळखिळी झाली, असे विखे म्हणाले.
पुढील स्‍लाइडवर वाचा, सरकारवर आरोपांच्या फैरी...