आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राहुल गांधी यांच्‍या बदललेल्‍या इमेजमुळे मोदी घाबरले, शरद पवार यांची भाजपवर टीका

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चंद्रपूर- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काँग्रेस उपाध्‍यक्ष राहुल गांधी यांची भिती वाटत आहे. त्‍यामुळेच बोफर्स प्रकरण पुन्‍हा उकरुन त्‍यांना बदनाम करण्‍याचा प्रयत्‍न केला जात आहे, असा आरोप राष्‍ट्रवादी काँग्रेसचे अध्‍यक्ष शरद पवार यांनी केला. ते गुरुवारी चंद्रपूर येथे कार्यकर्त्‍यांच्‍या मेळाव्‍यात बोलत होते. ते म्‍हणाले, राहुल गांधी यांना गुजरातच्‍या जनतेचा पाठिंबा मिळत आहे. त्‍यांच्‍या भाषणांना लोकांची पसंती मिळत आहे. राहुल यांच्‍या या बदलेल्‍या इमेजमुळे नरेंद्र मोदी घाबरले आहेत. 


गुजरात निवडणुकीमध्‍ये भाजपला राहुल यांची धास्‍ती
- पवार यांनी दावा केला आहे की, गुजरात विधानसभेच्‍या निवडणूक प्रचारामध्‍ये मतदारांचा काँग्रेसला चांगला पाठिंबा मिळताना दिसत आहे. याची तेथील भाजप सरकारने धास्‍ती घेतली आहे. 
- गुजरात विधानसभेसाठी 9 आणि 14 डिसेंबरोजी मतदान होत आहे. 18 डिसेंबररोजी निकाल लागणार आहे.


बोफोर्स प्रकरण पुन्‍हा उकरुन काढत आहे भाजप
- यावेळी पवार म्‍हणाले की, 'बोफर्स प्रकरणामध्‍ये राजीव गांधी फार पूर्वीच निर्दोष सिद्ध झाले आहेत. 
- 'आता तर राजीव गांधी आणि या प्रकरणातील मुख्‍य इटालियन व्‍यक्‍ती ओतावियो क्‍वात्रोकीही जिवंत नाही. तरीदेखील केंद्राने या प्रकरणाची पुन्‍हा सुनावणी करण्‍यात यावी म्‍हणून कोर्टात याचिका दाखल केली आहे.' 
- 'राहुल यांच्‍या बदलत्‍या इमेजमुळे भाजप आता घाबरली आहे. त्‍यामुळेच जुने प्रकरणे काढून त्‍यांना व त्‍यांच्‍या कुटुंबियांना भाजप बदनाम करत आहे.'  

 

 


  

बातम्या आणखी आहेत...