आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वैनगंगातील रोप-वेला अडकून नॅशनल फ्लाईंग अकादमीचे छाेटे विमान कोसळले, दाेन वैमानिक ठार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर- गोंदियातील बिरसी विमानतळावरील राजीव गांधी राष्ट्रीय विमान प्रशिक्षण केंद्राचे प्रशिक्षण विमान वैनगंगा नदीत कोसळून झालेल्या अपघातात चार अासनी विमानातील दोन वैमानिक ठार झाले. ही घटना बुधवारी सकाळी पावणेदहाच्या सुमारास घडली. या प्रशिक्षण केंद्राचे विमान कोसळण्याची मागील तीन वर्षांतील ही दुसरी घटना अाहे. नागरी उड्डयन महासंचालनालयाने या अपघाताची चौकशी सुरू केली आहे.   दरम्यान, रोपवेला अडकल्यामुळे हे विमान काेसळल्याचा प्राथमिक निष्कर्ष काढला जात अाहे.
 
वरिष्ठ वैमानिक रंजन गुप्ता ( ३८) यांच्यासह प्रशिक्षणार्थी वैमानिक हिमानी सिंह (२३) अशी मृतांची नावे अाहेत. बिरसी विमानतळाचे संचालक एस. राजा रेड्डी यांनी दिलेल्या माहितीनुसार, या चारआसनी छोट्या विमानाने (बीए-४२) बुधवारी सकाळी ९ वाजून २५ मिनिटांनी बिरसी विमानतळावरून उड्डाण केले होते. पंधरा मिनिटांनंतर या विमानाचा नियंत्रण कक्षाशी असलेला संपर्क तुटला. त्या वेळी विमान अंदाजे चार हजार फूट उंचावर होते. विमानाशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू असतानाच गोंदियापासून पश्चिमेला तिरोडा तालुक्यातील देवरी गावाजवळ वैनगंगेच्या पात्रात ते कोसळल्याची माहिती विमानतळ प्रशासनाला मिळाली. हे विमान अाधी वैनगंगेवरील रोपवेला अडकून नंतर खाली नदीपात्रात कोसळले. विमानाचा चेंदामेंदा झाला होता. 
 
काही सुटे भाग नदीच्या प्रवाहात वाहत असल्याचे आढळून आले. विमानातील दोन्ही वैमानिक जागीच मृत्युमुखी पडल्याचे आढळून आले. या घटनेनंतर प्रशिक्षण केंद्राच्या अधिकाऱ्यांनी विमान कोसळल्याच्या ठिकाणाकडे धाव घेतली. या अपघाताचे कारण स्पष्ट झालेले नसून नागरी उड्डयन महासंचालनालयाने (डीजीसीए) या अपघाताची चौकशी सुरू केली आहे. तीन वर्षांपूर्वी या केंद्राचे एक विमान अशाच पद्धतीने कोसळले होते. दरम्यान, वैनगंगा नदीपात्रात कपडे धूत असलेली इंदू मेश्राम ही तरुणी या घटनेत किरकोळ जखमी झाली, अशी माहिती काही प्रत्यक्षदर्शींनी दिली. घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. 
 
इंजिनात बिघाड?  
छोट्या विमानामध्ये ब्लॅकबॉक्स बसविण्यात अालेला नसतो. त्यामुळे विमानाच्या अपघाताचे नेमके कारण समजून घेण्यात अडचणी येत आहेत. त्यासाठी दिल्लीहून खास पथक बोलावण्यात आले आहे. विमान इतक्या खाली येण्याचे नेमके कारण काय, त्याच्या इंजिनमध्ये बिघाड निर्माण झाल्यामुळे वैमानिकाने ते नदीत लँड करण्याचा प्रयत्न केला हाेता का, असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... विमान दुर्घटनेची भीषणता दर्शवणारे फोटोज..

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...