आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागपुरात मुंढेंविरोधात भाजपचाही ‘अविश्वास’; राष्ट्रवादीने केले हाेते ठरावाचे समर्थन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर- नवी मुंबईचे महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याविरोधात नुकताच सर्वपक्षीय नगरसेवकांनी अविश्वास ठराव अाणला असून त्यांना पदावरून दूर करण्याची मागणी केली जात अाहे. भाजप नगरसेवकांचा मात्र या ठरावाला विराेध हाेता.

मुख्यमंत्रीही मुंढेंची पाठराखण करत असल्याची चर्चा अाहे. मात्र असे असले तरी सत्ताधारी भाजपने नागपूर जिल्हा परिषदेत मात्र तत्कालीन सीईअाे मुंढे यांच्याविरोधात अविश्वास ठराव आणला होता.

प्रशासनात पारदर्शकता आणणारे अधिकारी म्हणून तुकाराम मुंढे ओळखले जातात. नवी मुंबई महानगरपालिकेला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याकरिता त्यांनी पावले उचलली; मात्र पदाधिकारी नगरसेवकांशी जुळवून घेण्यात ते कमी पडले. परिणामी सदस्यांच्या रोषाला ते बळी पडले. २००८ मध्ये मुंढे नागपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईअाे) असताना रमेश मानकर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते. त्या वेळी हा अविश्वास ठराव आणण्यात आला होता. नियमात बसणारी कामे करणार नाही, अशी भूमिका घेत पदाधिकारी जि. प. सदस्यांच्या मर्जीप्रमाणे वागण्यास नकार दिल्यामुळे संघर्षाची ठिणगी पडली होती. नागपूर जिल्हा परिषदेच्या मुख्य इमारतीच्या बांधकामाला मंजुरी मिळाल्यानंतर त्याचे थाटामाटात भूमिपूजन करण्यास मुंढे यांनी परवानगी नाकारली. अधिकाऱ्यांना शिस्त लावली. भाजप, शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस त्या वेळी जिल्हा परिषदेत सत्तेत होते. मुंढे ऐकत नसल्यामुळे जिल्हा परिषदेच्या सभेत त्यांच्या विरोधात अविश्वास ठराव आणला होता.

मलाही सदस्यांचीच बाजू घ्यावी लागली
सनदी अधिकारी तुकाराम मुंढे नागपुरात जिल्हा परिदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी असताना त्यांनी अनेक चांगली कामे केली. प्रशासनाला शिस्त लावली. नियमबाह्यरीत्या कोणतेही काम ते करीत नव्हते. त्यामुळे अनेकदा सदस्य त्यांच्यात संघर्ष निर्माण व्हायचा. मी अध्यक्ष असताना त्यांच्याविरोधात ठराव आणण्यात आला होता. व्यक्तिश: मला ते पटले नव्हते तरी सदस्य विरोधात गेल्यामुळे मलाही मग सदस्यांचीच बाजू घ्यावी लागली.
-रमेश मानकर, माजी अध्यक्ष, जिल्हा परिषद.
बातम्या आणखी आहेत...