आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जिल्ह्यात २,१६० दुर्गा, शारदा देवींची स्थापना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - अमरावती शहरासह संपूर्ण जिल्ह्यात शनिवारपासून (दि. १) नवरात्री उत्सवाला भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला. घटस्थापनेच्या दिवशीच शहरासह जिल्ह्यात जवळपास हजार १६० सार्वजनिक मंडळांनी दुर्गा शारदा देवींची स्थापना केली आहे. हा उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी जवळपास अडीच हजार पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त राहणार आहे.
नवरात्री उत्सवांमध्ये जिल्ह्यातील शहरी ग्रामीण भागात शारदा दुर्गादेवींची स्थापना करण्यात येते. या काळात सर्वत्र धार्मिक उत्साहाचे वातावरण राहते. यावर्षी अमरावती आयुक्तालयातील दहा पोलिस ठाण्यांच्या हद्दीत ४८६ मंडळांकडून दुर्गा तर ७४ मंडळांकडून शारदादेवींची स्थापना करण्यात आली आहे. याचवेळी आयुक्तालयाची हद्द वगळता जिल्ह्यातील ३१ पोलिस ठाण्यांच्या हद्दीत हजार ४६० मंडळांनी सार्वजनिक ठिकाणी दुर्गा देवींची तसेच शारदा देवींची १९० मंडळांनी स्थापना केली आहे. याचवेळी आयुक्तालयात एकूण १२०० पोलिसांचा बंदोबस्त राहणार असून, यामध्ये सहायक पोलिस आयुक्त, २० पोलिस निरीक्षक, ९० सहायक पोलिस निरीक्षक, उपनिरीक्षक या अधिकाऱ्यांसह ९३० पोलिस कर्मचारी तसेच ११९ महिला कर्मचारी तैनात राहणार आहे. या व्यतिरीक्त राज्य राखीव पाेलिस दलाची तुकडी (१०० जवान), होमगार्डचे जवळपास ४०० जवान कार्यरत राहणार आहे. आयुक्तालयात एकूण ३१ ठिकाण पोलिसांनी संवेदनशील घोषित केले असून ,त्या ठिकाणांवर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. यासोबतच ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी पोलिसांची विशेष पाच पथक तयार करण्यात आले आहे. तसेच नवरात्री काळात शहरातील विविध ५७ सार्वजनिक ठिकाणी गरब्याचे आयोजन करण्यात आले आहे.

याचवेळी अमरावती ग्रामीणमध्ये अप्पर पोलिस अधीक्षक १, पोलिस उपअधीक्षक ५, पोलिस निरीक्षक १८, सहायक पोलिस निरीक्षक, उपनिरीक्षक ६५ या अधिकाऱ्यांसह १२०० पोलिस कर्मचारी तसेच राज्य राखीव पाेलिस दलाची तुकडी, होमगार्डचे ६५० जवान कार्यरत राहतील.
जिल्ह्यात४४३ गावांमध्ये ‘एक गाव एक दुर्गा - शारदा’ : अमरावतीआयुक्तालयाची हद्द वगळता अमरावती ग्रामीणमधील ४४३ गावांमध्ये ‘एक गाव एक दुर्गा - शारदा’ची स्थापना करण्यात आली आहे. यामध्ये ३८४ गावांमध्ये एकच दुर्गादेवी तर ५९ गावांमध्ये एकच शारदा देवीची गावकऱ्यांनी स्थापना केल्याचे ग्रामीण पोलिसांनी सांगितले. नवरात्रोत्सवामुळे शहरासह जिल्ह्यात उत्साहाचे वातावरण आहे.

बातम्या आणखी आहेत...