आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गडचिरोलीत हिंसक कारवायांमध्ये सहभागी असलेल्या आठ जहाल नक्षलवाद्यांना अटक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर- हिंसक कारवायांमध्ये सहभागी असलेल्या आठ नक्षलवाद्यांना अटक करण्यात गडचिरोली पोलिसांना यश आले असून एका नक्षलवाद्याने पोलिसांपुढे आत्मसमर्पण केल्याची माहिती नक्षलविरोधी अभियानाने दिली आहे. या कारवाईमुळे नक्षलवादी चळवळीला मोठा हादरा बसल्याचे मानले जात आहे. पोलिसांनी अटक केलेल्या नक्षलवाद्यांमध्ये जहाल नक्षलवादी रैनू काना पुंगाटी (रा. गोंगवाडा, भामरागड तालुका), जयलाल ऊर्फ पुसू मट्टामी (रा. एटापल्ली) या दोघांसह कोरके नेहा पल्लो, अशोक फकिरा सोमनकर, सुरू छिन्ना पुंगाटी, बंडू चिन्ना गेडाम, जोगे मज्जी, संतोष नारायण भांडेकर यांचा समावेश असल्याचे नक्षलविरोधी अभियानाच्या सूत्रांनी सांगितले. या नक्षलवाद्यांचा मेडपल्ली येथील भूसुरुंग स्फोटात हात असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. यापैकी रैनू पुंगाटी हा मागील दहा वर्षांपासून नक्षल दलममध्ये कार्यरत असून त्याचा अनेक हिंसक घटनांमध्ये सहभाग असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. जयलाल मट्टामी हा नक्षलवाद्यांच्या कंपनी-४ चा सदस्य असून त्याचाही अनेक घटनांमध्ये सहभागाचा दावा करण्यात आला आहे. या कारवाईमुळे नक्षलवादी चळवळीला गडचिरोलीत मोठा हादरा बसल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.  दरम्यान, मंगळवारी सोडी या छत्तीसगडच्या जहाल नक्षल्याने आत्मसमर्पण केले.
बातम्या आणखी आहेत...