आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nayansari Ducks Found In Amravati's Chhatri Lake

अमरावतीच्या छत्री तलावात आढळले नयनसरी बदक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - शहरातील छत्री तलाव परिसरात नयन सरी हे नवे बदक आढळले आहेत. हे बदक विदर्भात तुरळक आढळून येतात अमरावती जिल्ह्यात या बदकांच्या तुरळक नोंदी झालेल्या आहेत. हिवाळ्यात अंशतः स्थलांतर करतात. पक्षी निरीक्षक अनिरुद्ध बडे, केदार पावगी, राहुल देशपांडे, मनोज बिंड यांनी छत्री तलाव परिसरात नयन सरी बदकाची नोंद घेतली. अन्य उपलब्ध नोंदी वर्णने तपासून इतर ज्येष्ठ पक्षी निरीक्षकांकडून या पक्ष्याची ओळख पटवली. या बदकांची संख्या संकटग्रस्त स्थितीच्या जवळ असून, हा पक्षी आफ्रिकन-युरेशियन स्थलांतरित जल पक्ष्यांच्या संवर्धन करारात सामील आहे, असे या पक्षी निरीक्षकांचे म्हणणे आहे. . पूर्ण वाढ झालेले नर मादी सारख्याच गडद तांबूस पिंगट रंगाची गडद रंगाच्या पाठीची असतात आणि शेपटी खाली पांढऱ्या रंगामुळे ओळखू येतात.
बदकांची संख्या धोक्यात
यांच्या अधिवासाची हानी, प्रजनन लायक मैदानांचा नाश, तलावांवर होणारा मानवीय हस्तक्षेप आदी कारणांमुळे या बदकांची संख्या धोक्यात आली आहे. त्यामुळेच या पक्ष्याचा समावेश संकटग्रस्त स्थितीच्या जवळ जाणाऱ्या पक्ष्यांच्या सुचित करण्यात आला आहे. केदार पावगी, पक्षीनिरीक्षक अमरावती.

स्थलांतर आहे अंशात्मक
मध्यआणि पूर्व युरोप, आफ्रिका खंडात इजिप्त, नायजेरिया तसेच दक्षिण-पश्चिम आशिया आणि भारतीय उपखंडात ह्या पक्ष्यांची प्रजोत्पादन करणारी संख्या आढळते. हे बदक अंशात्मक स्थलांतर करतात तसेच या पक्ष्यांचा हिवाळी अधिवास मध्य पूर्व, उत्तर-पूर्व आणि पश्चिम आफ्रिका आणि दक्षिण-पूर्व आशिया या दरम्यान असतो.