आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पवार, तटकरे, भुजबळांच्या खुल्या चौकशीचे काय झाले, कोर्टाची विचारणा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर- सिंचन घाेटाळाप्रकरणी अजित पवार, सुनील तटकरे आणि छगन भुजबळ या राष्ट्रवादी काँग्रेसच्या तीन माजी मंत्र्यांच्या खुल्या चौकशीचे नेमके काय झाले? याची सद्य:स्थिती दोन आठवड्यांत सादर करण्याचे निर्देश नागपूर खंडपीठाने गुरुवारी राज्य सरकारला दिले आहेत.

जनमंच स्वयंसेवी संस्थेच्या याचिकेवर गुरुवारी सुनावणी झाली. यासंदर्भात तत्कालीन महाधिवक्ता सुनील मनोहर यांनी अजित पवार, सुनील तटकरे आणि छगन भुजबळ या तीन मंत्र्यांच्या खुल्या चौकशीचे आदेश सरकारने दिले असल्याची माहिती १२ डिसेंबर २०१४ रोजी न्यायालयास दिली होती. मात्र, त्यासंदर्भात अद्याप कुठलाही एफआयआर दाखल झालेला नाही. त्या चौकशीचे नेमके काय झाले? असा प्रश्न जनमंचचे अॅड. फिरदोस मिर्झा यांनी न्यायालयात उपस्थित केला. सिंचन प्रकल्पांच्या बांधकामासंदर्भात दरवाढीच्या नावाखाली तीन महिन्यांच्या कालावधीत सुमारे १६ हजार कोटींची बिले काढण्यात आली होती. त्याची वसुली होण्याची गरज आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. त्यावर न्यायालयाने सरकारला दोन आठवड्यांत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले.
गाेसेखुर्द : उजव्या कालव्याचे काम पूर्ण
सिंचन विभागाने गोसेखुर्द प्रकल्पाबाबत प्रतिज्ञापत्राद्वारे माहिती दिली. या प्रकल्पाच्या उजव्या कालव्याचे काम पूर्ण झाले असून डाव्या कालव्याच्या २३ किलोमीटरच्या पुनर्बांधणीचे काम त्याच ठेकेदाराकडून करवून घेत असल्याचे त्यात म्हटले अाहे.
बातम्या आणखी आहेत...