आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘राष्ट्रवादी’च्या हल्लाबोल दिंडीत उत्साही वऱ्हाडी; पवार यांनी नवरदेवाला केला पाचशे रुपये अाहेर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल पदयात्रेत चक्क लग्नासाठी निघालेला उत्साही नवरदेव आणि वऱ्हाडी मंडळीदेखील सहभागी झाल्याचे चित्र साेमवारी वर्धा जिल्ह्यातील भिडी येथे बघायला मिळाले. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्या नवरदेवाचे कौतुक करीत त्याला पाचशे रुपयांचा ‘अाहेर’ही केला.    


यवतमाळहून निघालेली राष्ट्रवादीची पदयात्रा वर्धा जिल्ह्यात पोहोचली. भिडी येथे ही पदयात्रा आली त्यावेळी एका लग्नाचे वऱ्हाड त्याच मार्गाने यवतमाळला जात होते. राष्ट्रवादीची पदयात्रा पाहून नवरदेवाने वाहने थांबवून पदयात्रेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्याच्यासोबत वऱ्हाडी मंडळीही पदयात्रेत सहभागी झाली. नवरदेवाने अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह सेल्फी काढून घेतला तर अजित पवार यांनी त्याचे कौतुक करीत त्याला पाचशे रुपयांचा अाहेर केला. शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी आणि त्यांना दिलासा मिळावा, अशी अपेक्षा नवरदेवाने या वेळी व्यक्त केली.   


या पदयात्रेत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्य सरकारवर टीकेची झोड उठविली. सरकारने जुन्याच गोष्टी सांगण्यापेक्षा नवी कामगिरी दाखवावी, असे आवाहन त्यांनी केले. राज्य सरकारला आश्वासने पूर्ण करता आलेली नाहीत. त्यामुळे जनतेत मोठा असंतोष आहे. हा असंतोष हल्लाबोल दिंडीच्या माध्यमातून दिसत असल्याचेही ते म्हणाले.  तर सरकारने कर्जमाफी नेमकी कोणाला दिली? असा सवाल खासदार सुप्रिया सुळे यांनी या वेळी बोलताना केला. कर्जमाफी संदर्भात राज्य सरकारने श्वेतपत्रिका काढावी, अशी मागणीही खासदार सुळे यांनी केली.

 

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा... सुप्रिया सुळेंनी हल्लाबोल आंदोलनात धरला आदिवासी नृत्यावर ठेका; फोटो आणि व्हिडिओ... (शेवटच्या स्लाइडवर)

बातम्या आणखी आहेत...