आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुचाकी अपघातात एक ठार, तर दोघे जखमी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुसद - दुचाकी अपघात झाल्याने एक ठार, तर दोघे जखमी झाल्याची घटना पुसद ग्रामीण पोलिस ठाणे हद्दीत भोजला ते पिंपळगाव रोडवरील शेलू खुर्द येथे शनिवारी रात्री १०.४५ वाजता घडली. याप्रकरणी वसंतनगर पोलिस ठाण्यात मर्ग दाखल करण्यात आला. 
 
वसंतनगर पोलिस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या भोजला येथील रहिवासी संतोष नारायण गायकवाड वय २५ यांनी १२ ऑगस्ट रोजी रात्री रेती आणण्यासाठी मजूर म्हणून गावातील सचिन संजय खंदारे वय २५ भगवान नामदेव कळंबे वय २५ यांना दुचाकीवरून घेऊन गेला. दरम्यान, भोजला ते पिंपळगाव रोडवरील शेलू खुर्द जवळ रात्री १०.४५ वाजता दुचाकीचा अपघात झाला. यामध्ये भगवान कळंबेचा मृत्यू झाला, तर जखमी दुचाकी चालक संतोष गायकवाड सचिन खंदारे यांच्यावर येथील लाइफलाइन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. जयकुमार नाईक यांच्या मार्फत वाॅर्डबॉय नंदू सराणे यांनी दिलेल्या माहितीवरून वसंतनगर पोलिसांनी मर्ग दाखल केला. 
बातम्या आणखी आहेत...