आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शरद पवारांबद्दल अाक्षेपार्ह पाेस्ट टाकणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल, खासदार सुप्रिया सुळे यांची माहिती

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल साेशल मीडियावर अाक्षेपार्ह पाेस्ट टाकणाऱ्या नागपूरच्या ३४ वर्षीय तरुणाला ताब्यात घेण्यात अाले हाेते. पवारांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ही माहिती दिली.   


धंताेलीतील रहिवासी वालचंद गिते असे या युवकाचे नाव अाहे. वालचंदने पवार यांच्या टि‌्वटर अकाउंटवर १५ नाेव्हेंबर राेजी रात्री ११.३७ ते ११.५०  यादरम्यान ही अाक्षेपार्ह पाेस्ट केली हाेती. याप्रकरणी १६ नाेव्हेंबर नंदनवन पाेलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात अाली हाेती. त्यावरून वालचंदविराेधात गुन्हा दाखल करण्यात अाला हाेता. त्यानंतर वालचंदला बाेलावून त्याची चाैकशी केली अाणि नंतर त्याला समज देऊन साेडून दिले, अशी माहिती वरिष्ठ पाेलिस निरीक्षक माणिक नलावडे यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...