आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागपुरमध्ये सापडला शेपटी असलेला तरुण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - विज्ञान आणि आधुनिक वैद्यकीय उपचाराला आव्हान देणारी एक घटना नागपुरात उघडकीस आली. एका १८ वर्षांच्या तरुणाला कमरेच्या खाली मोठे शेपूट असल्याचा प्रकार उघडकीस आला. जन्मापासून असलेले शेपूट या तरुणाने लाजेखातर आतापर्यंत लपवून ठेवले. मात्र, त्याचा त्रास असह्य झाला तेव्हा नागपूरच्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयात उपचारासाठी आला. आता डॉक्टर शस्त्रक्रिया करून ही शेपटी काढणार आहेत.

मानवाची उत्पत्ती वानरांपासून झाल्याचे मानले जाते, तरीही शेपटी असलेला माणूस अाता शाेधूनही सापडत नाही. असे असताना या तरुणामुळे पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. या तरुणाला जन्मापासूनच थोडीथोडकी नव्हे तर तब्बल १९-२० सेंटिमीटर लांब शेपटी आहे. म्हणूनच त्याच्या पालकांनीही त्याचे नाव मारुती ठेवले. लहान होता तोवर ठीक होते. पण मोठा झाल्यावर झोपताना आणि इतर वेळी मारुतीला याचा त्रास होऊ लागला. कमरेखाली शेपूट असले तरी मारुतीला इतर कुठलाही त्रास नाही. अखेर त्रास असह्य झाल्याने तो नागपूरच्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयात भरती झाला. शस्त्रक्रिया करून डॉक्टर त्याचे शेपूट समूळ काढणार आहेत.

आईकडून फॉलिक अॅसिडचे सेवन कमी
या प्रकारची शेपटी असणे हा मानवी शरीराचा अपभ्रंश असल्याचे न्यूरो सर्जरी विभागाचे प्रमुख डॉ. प्रमोद गिरी यांनी सांगितले. शेपटीचा किंवा शेपटी कापल्याचा त्याच्या शरीरावर कुठलाही विपरीत परिणाम होणार नसल्याचे ते म्हणाले. बाळ गर्भात असताना फॉलिक अॅसिडचे सेवन कमी झाले की असे प्रकार होत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. २-३ सेंटिमीटर लांब शेपटी असलेल्या व्यक्ती पाहण्यात आल्या. मात्र, १९-२० सेंटिमीटर लांब शेपटी असलेला व्यक्ती कमी आढळतो.
बातम्या आणखी आहेत...