आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हजसाठी महाराष्ट्राच्या कोट्यामध्ये मोठी वाढ, आता साडेनऊ हजारांवर यात्रेकरूंना संधी मिळणार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाईल फोटो - Divya Marathi
फाईल फोटो
नागपूर - हज यात्रेसाठी जाऊ इच्छिणाऱ्या महाराष्ट्रातील मुस्लिम बांधवांसाठी राज्यातील हज यात्रेकरूंच्या कोट्यात २ हजार ४२३ ने वाढ करण्यात आली असल्याने आता महाराष्ट्रातून ९ हजार ७८० यात्रेकरूंना हज यात्रेची संधी मिळणार असल्याची माहिती सेंट्रल तंझीम कमिटीचे उपाध्यक्ष शहीद नसीम खान यांनी दिली. 

खान यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षी ७ हजार ३५७ यात्रेकरू जाऊ शकले होते. या वर्षी ५७ हजार २४६ यात्रेकरूंचे अर्ज आले असून त्यात १४ हजार ५८१ अर्ज आरक्षित वर्गवारीतील आहेत. आरक्षित वर्गवारीत ७० अथवा त्यापेक्षा अधिक वयाचे ज्येष्ठ नागरिक तसेच पाच वर्षांपासून अर्ज करणाऱ्या यात्रेकरूंचा समावेश आहे. यापैकी ४ हजार ९२४ अर्ज थेट स्वीकारण्यात आले असून त्यात आरक्षित वर्गवारीतील यात्रेकरूंचाच समावेश आहे. चौथ्यांदा अर्ज करणाऱ्यांची संख्या ९,६५७ असून ४ हजार ८५६ यात्रेकरूंची थेट निवड होईल तर उर्वरित ४८०० अर्ज प्रतीक्षा यादीत असतील.
बातम्या आणखी आहेत...