आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यवतमाळ : विहिरीतील गाळ न काढल्यामुळे नगर सेविका पतीची नगरपालिकेत तोडफोड

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगरसेविकेच्या पतीने यवतमाळ येथील नगरपालिका कार्यालयातील साहित्याची अशी तोडफोड केली. - Divya Marathi
नगरसेविकेच्या पतीने यवतमाळ येथील नगरपालिका कार्यालयातील साहित्याची अशी तोडफोड केली.
यवतमाळ - लोहारा परिसरातील वॉर्ड क्रमांक १४ मधील विहिरीतील गाळ काढण्यासंदर्भात नगरसेविका चैताली बेलोकार यांनी दोन महिन्यांपूर्वी नगरपालिकेत तक्रार दिली होती. तक्रार देऊन दोन महिने लोटले तरी पालिकेने या संदर्भात ठोस पावले उचलली नाहीत. त्यामुळे संतापलेल्या नगरसेविकेच्या पतीने पालिकेत जाऊन कार्यालयातील साहित्याची तोडफोड केली. ही घटना मंगळवार, २३ मे रोजी दुपारी १२ वाजता घडली. नीलेश बेलोकार वय २५ रा. लोहारा असे नगरसेविकेच्या पतीचे नाव असून त्याच्याविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. 
 
उन्हाची तीव्रता वाढत असल्याने नदी, नाले आटले आहेत. शहरातील विविध भागात एप्रिल महिन्यापासून पाणीटंचाईचा प्रश्न निर्माण होतो. अशातच लोहारा परिसरातील नगरसेविका चैताली बेलोकार यांनी वॉर्ड क्रमांक १४ मधील शिवाजी नगर परिसरात असलेल्या विहिरीतील गाळ काढण्यात यावा, तसेच वार्डात टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची मागणी नगरपालिकेत तक्रारीच्या स्वरूपात केली होती. या संदर्भात अनेकदा विचारपूस करण्यात आली. मात्र, समाधानकारक उत्तर त्यांना मिळाले नाही. दरम्यान, २३ मे रोजी नगरसेविका चैताली बेलोकार यांचे पती नीलेश बेलोकार यांनी नगरपालिकेत जाऊन या संदर्भात विचारपूस केली. दोन महिन्याआधी तक्रार दाखल केली असून अद्यापही पालिकेने ठोस पावले उचलली नाही. त्यामुळे ते संतापले. दरम्यान त्यांनी नगरपालिकेतील मॉनिटर, टेबलवरील काचाची तोडफोड केली. 

कर्मचाऱ्यांनी केले कामबंद आंदोलन 
नगरपालिका कार्यालयातील साहित्याची तोडफोड केल्या प्रकरणी पालिकेतील अधिकारी कर्मचाऱ्यांनी २३ मे रोजी एक दिवसीय काम बंद आंदोलन केले. त्याचबरोबर घडलेल्या घटनेचा निषेध करून नीलेश बेलोकारविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलनादरम्यान केली आहे. 
 
पुढील स्लाइडवर वाचा, नगरसेविकेच्या पती विरुद्ध तक्रार दाखल... 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...