आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रस्त्यालगत सदा-सर्वदा वाचनालय सुरू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - एव्हानाटीव्हीवरील विविध मालिका, मोबाईल अॅप्स आणि व्हीडीओ गेम्समुळे वाचन संस्कृती लोप पावत आहे. तरुणाई शालेय विद्यार्थ्यांचे वाचनाकडे अजिबात लक्ष नाही. त्यांना पुस्तकांकडे आकर्षित करून ज्ञानात भर घालण्याच्या उद्देशाने कॅम्प परिसरातील केशव काॅलनीतील गर्ल्स हायस्कूल चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणाऱ्या मार्गावर शाश्वत कन्सेप्ट अकादमीतर्फे सुमारे एक हजार फूट जागेवर तंबू ठोकून सदा-सर्वदा खुले वाचनालय सुरू करण्यात आले आहे. शालेय विद्यार्थ्यांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांना वाचता येतील अशी पुस्तके येथे टेबलवर मांडून ठेवण्यात आली आहेत. ज्याला पुस्तक वाचायचे असेल त्याने येथेच पुस्तक उघडून ते वाचायचे. त्याला ते घरी नेता येणार नाही. येथे पुस्तक वाचण्यासाठी बसण्याची सोयही करण्यात आली आहे. 
 
शहरातील मुख्य रस्त्यावर हे खुले वाचनालय असल्यामुळे येणारे-जाणारे कौतुहलाने याकडे बघत आहेत. शहरात एका संस्थेने फिरते वाचनालय सुरू केले आहे. वाचन संस्कृती जोपासली जावी म्हणून हा एक आगळा-वेगळा प्रयत्न आहे. येथे विज्ञान, गणित, गोष्टी, विदर्भ, राज्य आणि देशाची माहिती देणारी विविध विषयांवरील सुमारे ३५० पुस्तके ठेवण्यात आली आहेत. 
रस्त्यालगत सुरू करण्यात आलेले सदा-सर्वदा खुले वाचनालय. 

वाचन संस्कृती वाढीचा प्रयत्न 
^सर्वसामान्यांचा वाईट गोष्टींकडून वाचनाकडे लक्ष वळवण्याचा हा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे. वाचन संस्कृती वाढावी आणि पुस्तकांसारख्या ज्ञानात भर घालणाऱ्या माध्यमाची गोडी लागावी हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे. अतुलगायगोले, सदा-सर्वदा खुले वाचनालय,अमरावती. 

 
बातम्या आणखी आहेत...