आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दहा महिन्यांच्या बाळाच्या जीवाशी डॉक्टरने केला ‘खेळ’,कपाळावरील गाठीऐवजी दुसरीकडेच केले ऑपरेशन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या दहा महीन्याच्या बालकाच्या कपाळाला गाठ होती. या बाळाच्या वडीलांनी त्याला याच गाठीच्या ऑपरेशनसाठी रुग्णालयात दाखल केले होते मात्र कपाळावरील गाठीचे ऑपरेशन करण्याऐवजी डॉक्टरांनी शरीराच्या इतर ठिकाणच्या अवयवाचे ऑपरेशन केल्याचा आरोप रुग्णाच्या नातेवाईकांनी केला आहे.
 
 या प्रकारामुळे बाळाचे नातेवाईक संतप्त झाले होते. या प्रकाराबाबत पोलिस तक्रार देणार असल्याचे काही नातेवाईक सांगत होते. मात्र शनिवारी रात्री आठ वाजेपर्यंत त्यांनी तक्रार दिली नव्हती. रुक्मिनीनगर परिसरात असलेल्या एका खासगी रुग्णालयात हा धक्कादायक प्रकार घडला आहे.
 
दहा महीन्याच्या बाळाला कपाळावर असलेली गाठ काढण्यासाठी रुग्णालयात शनिवारी सकाळी त्याच्या आई वडीलांनी आणले. दुपारी बारा वाजताच्या सुमारास बाळाचे ऑपरेशन झाले, त्याला ऑपरेशन थेअटरमधून बाहेर आणले. त्यावेळी बाळाच्या आई वडीलांनी पाहीले तर बाळाच्या कपाळावरील गाठ कायम होती आणि शरीराच्या इतर एका ठिकाणी पांढरी पट्टी लागलेली दिसली.
 
या प्रकारामुळे बाळाचे वडील तर चक्रावलेच इतर नातेवाईक आल्यानंतर त्यांनी या प्रकाराबाबत प्रचंड संताप व्यक्त केला. त्यामुळे रुग्णालयात काही वेळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती. मात्र शनिवारी रात्रीपर्यंत या प्रकरणी फ्रेजरपुरा पोलिसात तक्रार दाखल झाली नव्हती. 
 
 
बातम्या आणखी आहेत...