आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्वांनी घेतली कॉपीमुक्तीची शपथ, दर्यापूरच्या रत्नाबाई राठी हायस्कूलमधील दहावीच्या विद्यार्थ्यांनी घेतली प्रतिज्ञा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दर्यापूर-  येथील रत्नाबाई राठी हायस्कूलमध्ये इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना नुकतीच कॉपीमुक्त तणावरहित वातावरणात परीक्षेला सामोरे जाण्याची शपथ देण्यात आली. 

मुख्याध्यापक राजेंद्र गायगोले यांनी कॉपीमुक्त तणावरहित वातावरणात परीक्षा देण्याचा संस्कार विद्यार्थ्यांना दिला. बोर्डाची परीक्षा असली तरी विद्यार्थ्यांनी घाबरुन जाण्याचे मुळीच कारण नाही. आतापर्यंत शाळेत दिलेल्या परीक्षांप्रमाणे हीसुद्धा परीक्षा आहे. त्यामुळे या परीक्षेचा नाहक ताण घेता तयारीनिशी सहजपणे परीक्षेला सामोरे जाण्याचा सल्ला देण्यात आला. 
या वेळी विद्यार्थ्यांना कॉपी प्रतिबंध अधििनयमाचे स्वरुप त्या माध्यमातून होणाऱ्या शिक्षेचे दुष्परिणाम याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
 
या वेळी मुख्याध्यापक गायगोले, पर्यवेक्षक जी. एम. गौरखेडे, शिक्षक, शिक्षिका विद्यार्थी या उपक्रमात सहभागी झाले होते. पालकांनीही या उपक्रमाचे स्वागत करत कॉपीमुक्त तणावरहीत परीक्षा अभियानास सहर्का करण्याचे आश्वासन दिले. कार्यक्रमाचे संचालन आभार प्रदर्शन के. आर. धोटे यांनी केले. 
बातम्या आणखी आहेत...