आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

...तर वर्षभर ११वीला प्रवेश मिळणार नाही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- नव्या अकरावीच्या केंद्रीय प्रवेश पद्धतीत असा काही घोळ आहे की, सर्वच गोंधळात पडले आहेत. संभ्रम निर्माण झाला तो वेगळा. आता यात नव्या माहितीची भर पडली असून प्राधान्य क्रमानुसार पहिला पर्याय मिळाल्यानंतरही विद्यार्थ्याने जर संबंधित महाविद्यालयात प्रवेश घेतला नाही तर त्याला वर्षभर प्रवेशाची संधी मिळणार नाही, अशी माहिती प्रवेश समितीचे माजी सचिव, वर्तमान सदस्य अरविंद मंगळे यांनी दिली.
 
मात्र दुसरा पर्याय ज्या विद्यार्थ्यांना मिळाला आहे, त्यांना प्रवेशाच्या दुसऱ्या फेरीत (१५ ते १८ जुलै) प्रवेशासाठी नव्याने अर्ज सादर करता येणार आहे.

याच भितीपोटी त्यांनी ज्या विद्यार्थ्यांना प्राधान्य क्रमानुसार महाविद्यालये मिळाली त्यांचे रात्रभर क्रमांक शोधून संबंधित कर्मचाऱ्यांना विद्यार्थ्यांना फोन करायला लावले. तसेच आज पहिल्या फेरीत प्रवेश घेण्याचा अंतिम दिवस असल्यामुळे प्राधान्याने प्रवेश घ्या असे सांगण्यात आले. विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण जाऊ नये म्हणून माहिती देण्यासाठी रविवारीही मातोश्री विमलाबाई देशमुख महाविद्यालयातील विभागीय केंद्र सुरू राहणार आहे.

पहिल्या फेरीत प्रवेश घेण्याच्या अंतिम दिवशी कोणीही प्रवेशापासून वंचित राहू नये म्हणून सायं. पर्यंत जे विद्यार्थी येतील त्यांची नावे प्रथम संगणकातील प्रोग्राममध्ये फिड करण्यात आली. कारण सायं. वाजता लिंक बंद होणार होती, अशी माहितीही मंगळे यांनी दिली.
 
झोनच्या मातोश्री विमलाबाई देशमुख, भारतीय महाविद्यालय, रामकृष्ण महाविद्यालय आणि संत कंवरराम महाविद्यालय चारही केंद्रावर शिक्षण विभागाच्या एकाही अधिकाऱ्याने भेट दिली नाही. आॅनलाईन अर्जच अनेकांना समजला नाही. पहिल्या फेरीसाठी १२२३६ अर्जांची नोंदणी झाली. त्यापैकी शहरातील ६४७९ विद्यार्थ्यांना इच्छेनुसार महाविद्यालये मिळाली. अद्याप हजार १० उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्रवेश शिल्लक आहेत. मातोश्री
 
विमलाबाई केंद्रावर ४८० जागांसाठी ३७३ मुलांची यादी आली. दोन दिवसांत केवळ ७७ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले होते. अंतिम दिवसाची यादी उपलब्ध झाली नाही.
सुखदेव देशभ्रतार यांच्या नातीला ६० टक्के गुण मिळाले. परंतु, तिचे कोणत्याही महाविद्यालयाच्या यादीत नाव नाही. तिने महाविद्यालयाचे पर्याय निवडताना दोनच महाविद्यालये मागितल्याने हा गोंधळ झाला.
 
बातम्या आणखी आहेत...