आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युथ होस्टेलच्या कार्यकर्त्यांनी राखला राष्ट्रध्वजाचा सन्मान

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- स्वातंत्र्यदिनीलहान मुलांच्या हातून अनवधानाने खाली पडलेले कागदी राष्ट्रध्वज इतर राष्ट्रीय प्रतिकांचे दुपारी ते सायंकाळी ५.३० पर्यंत संकलन करून युथ होस्टेलच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रध्वजाचा सन्मान राखणारा स्तुत्य उपक्रम शहरात राबवला.
आपल्या सर्वांचा प्राणप्रिय तिरंगा ध्वज १५ ऑगस्ट रोजी दिमाखात फडकत असतो. ते बघून अनेक जण कागदी ध्वज गाड्यांवर घेऊन निघतात. कोणी लहान तिरंग्याचे स्टिकर दुचाकी किंवा चारचाकी वाहनांना लावतात. मात्र, अनवधानाने ते खाली पडतात.

राष्ट्रीयत्वाचे प्रतीक तिरंग्याचा अपमान होऊ नये तसेच नागरिकांना चांगली सवय लागावी, या उद्देशाने युथ होस्टेलच्या अमरावती शाखेचे अॅड. अतुल भारद्वाज, डॉ. उदय मांजरे, प्रा. विजय पांडे, प्रा. दीनानाथ नवाथे, प्राची पालकर, प्रा. वर्षा चांगोले, मंगला रुळकर, प्रा. मीनाक्षी राजपूत, काळे, कल्याणी भारद्वाज, शुभदिनी कुळकर्णी, वेदांत भारद्वाज, गुलालकरी, मास्टर सांगोले, रोहित कोठार, घोरपडे, कदम, प्रा. खुराडे, अनुश्री गुलालकरी, खंडारे, भाग्यलक्ष्मी चांगोले, केतन, डॉ. माभरे यांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग घेतला. युथ होस्टेलच्या कार्यकर्त्यांनी सवातंत्र्यदिनी कागदी ध्वज प्लास्टिक गोळा केले.

जनजागृतीचा छोटासा प्रयत्न
तिरंगा ध्वज हा आपली शान आहे. राष्ट्रध्वज चुकून खाली पडलेला दिसला तर तो उचलणे हे आपले कर्तव्य आहे. याची जाणीव करून देण्यासाठी प्रथमच हा उपक्रम शहरात राबवल्याची माहिती युथ होस्टेल ऑफ इंडियाच्या अमरावती शाखेने दिली.
१५ किलो प्लास्टिक कचरा केला गोळा
जिल्हास्टेडियम, इर्विन चौक, जयस्तंभ चौक, राजकमल चौक, रेल्वेस्थानक, बसस्थानक, कॅम्प परिसर, गर्ल्स हायस्कूल चौक येथून २० ध्वज उचलून ते सन्मानाने ठेवण्यात आले. त्याचप्रमाणे चार मोठ्या बॅग्ज भरतील एवढे १५ किलो प्लास्टिकही उचलण्यात आल्याची माहिती डॉ. मांजरे यांनी दिली.