आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धडक करावाई: ‘एलसीबी’ने अवघ्या 4 तासांत पकडल्या चोरीच्या 17 दुचाकी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - ग्रामीण पोलिसांच्या एलसीबीने बुधवारी (दि. ४) रात्री १० वाजताच्या सुमारास कुऱ्ह्यातून एका दुचाकी चोरट्याला ताब्यात घेतले होते. चौकशीअंती पाेलिसांना त्याच्याकडून तब्बल १७ दुचाकी जप्त करण्यात यश आले आहे. बुधवारी मध्यरात्री ते गुरूवारी पहाटे वाजेपर्यंत पोलिसांनी या १७ दुचाकी विविध ठिकाणांहून जप्त केल्या आहेत. तसेच या चोरट्याकडून पोलिसांनी एक वाटमारीचा आणि बॅगचोरीचा गुन्हा उघड झाला आहे. 
 
अंकुश वंसतराव तिरमारे (२४, रा. कुऱ्हा) असे पोलिसांनी अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे. अंकुश तिरमारे हा दुचाकी चोऱ्या करत असून यापुर्वी मंगळसूत्र चोरीमध्येही त्याचे नाव पोलिसांच्या नोंदी होते शिवाय काही महिन्यांपूर्वी त्याला नागपूर पोलिसांनीही अटक केली. दरम्यान, अंकुश कुऱ्ह्यात आल्याची माहिती मिळताच एलसीबीचे एपीआय नागेश चतरकर त्यांच्या पथकाने बुधवारी रात्री १० वाजता कुऱ्ह्यात जाऊन अंकुशला ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता सुरूवातीला त्याने दुचाकी चोरी केलीच नसल्याचे पोलिसांना सांगितले. मात्र; पोलिसांनी आपल्या पद्धतीने चौकशी केली असता त्याने दुचाकींची माहीती दिली. सदर दुचाकी कोणकोणत्या ठिकाणी आहे, ही माहिती पोलिसांना त्याने दिली. पण प्रत्येक दुचाकी वेगवेगळ्या व्यक्तीकडे होती. स्थानिक कुऱ्हा कुऱ्ह्याच्या परिसरातील गावांमध्ये या दुचाकी त्याने गहाण, विक्री, उधारीवर पैसे घेऊन ठेवल्या होत्या. त्यामुळे मध्यरात्री वाजतापासून पोलिसांनी दुचाकी जप्तीचे ‘ऑपरेशन’ सुरू केले होते. पहाटे सहा वाजेपर्यंत पोलिसांनी तब्बल १७ चोरीच्या दुचाकी सतरा ठिकाणांहून जप्त केल्या आहेत. तसेच त्याच्याकडून शहरातील एका बॅग चोरीचा आणि कुऱ्ह्याला काही दिवसांपुर्वी एका व्यापाऱ्याला लाख हजार रुपयांनी लुटल्याच्या गुन्ह्याचीही कबुली त्याने दिली आहे. दरम्यान, अंकुशचा एक सहकारी अजूनही पसार असून त्याचा शोध पेालिसांनी सुरू केला आहे. त्याला अटक केल्यानंतर पोलिसांना अजूनही दुचाकी चोरीचे गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे. ही कारवाई एलसीबीचे पोलिस निरीक्षक अनिल लाड यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय नागेश चतरकर, एएसआय मुलचंद भांबुरकर, अरुण मेटे, सचिन मिश्रा, शकिल चव्हाण, युवराज मानमोठे, तेलगाटे आणि लोहकरे या पथकाने केली आहे. 

१७ पैकी १३ ‘स्प्लेंडर’ 
पोलिसांनी जप्त केलेल्या १७ दुचाकींपैकी तब्बल १३ दुचाकी या हिरो होंडा स्पलेंडर आहेत. जप्त झालेल्या या दुचाकींमध्ये बहुतांश दुचाकी या शहर पोलिसांच्या हद्दीतून चोरी गेलेल्या आहेत तर काही ग्रामिणमधील सुध्दा आहे. जप्त झालेल्या दुचाकी मालकांचा शोध घेण्याचे काम पोलिसांनी सुरू केले आहे. जप्त केलेल्या दुचाकींची किंमत साडेपाच लाख आहे. 

जप्त केलेल्या चोरीच्या दुचाकीसह एलसीबीचे पोलिस पथक. 

ते हजारात करायचा दुचाकीची विक्री 
अंकुशत्याच्या सहकाऱ्याने चोरलेल्या दुचाकींची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी अंकुशची होती. चोरीची दुचाकी विक्री करताना अडचणी येणार म्हणून तो वेगवेगळी कारण सांगायचा, पुढील व्यक्तीकडून किंवा हजार रुपये घ्यायचा, त्याला दुचाकी द्यायचा. काही दुचाकी त्याने गहाण ठेवल्या होत्या तर काहींकडून उधारीवर पैसे घेतले ते परत करता त्याला दुचाकी द्यायचा. असेही पेालिसांच्या तपासात पुढे आले आहे. 

गुन्हे उघड होणार 
- आम्ही एकालाअटक केली त्याच्याकडून चोरीच्या १७ दुचाकी जप्त झाल्या. एक वाटमारी बॅगचोरीचा गुन्हाही पुढे आला. त्याच्या पसार सहकाऱ्याकडून काही गुन्हे उघड होतील. अनिललाड, पोलिस निरीक्षक ,एलसीबी 
 
बातम्या आणखी आहेत...