आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

4 महिन्‍याचे बाळ आईने मंदिरात सोडले बेवारस, पोलिसांच्‍या कुशीत ते हसायला लागले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाशीम - अाईच्‍या प्रेमाचे अनेक उदाहरणं आपण नेहमीच पाहतो. मात्र ही घटना एका निष्‍ठुर जन्‍मदात्‍या आईची ओळख करून देईल. एका आईने तिचे चार महिन्याच्‍या मुलाला वाशीम तालुक्यातील कोंडाळा झामरे येथील कोंडाळेश्वर मंदिरात बेवारस सोडून दिले आहे. ही घटना गुरुवारी दुपारी ही घटना समोर आल्‍याने परिसरात एकच खळबळ उडाली.

ही अज्ञात महिला बाळासह कोंडाळा झामरे येथील कोंडाळेश्वराच्‍या मंदिरात दुपारी आली होती. तिने साडीचा पाळणा बांधला नि त्‍यामध्‍ये चार महिन्याच्‍या गोंडस बाळाला बेवारस सोडून दिले. काही काळातच हा प्रकार गावक-यांच्‍या लक्षात आला. सुरूवातीला आई कुठे गेली असावी असा अंदाज बांधण्‍यात आला. पण मुलाला घेण्‍यासाठी ती आलीच नसल्‍याने गावक-यांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिस उपनिरीक्षक पाठक यांनी सहका-यांसह घटनास्‍थळी धाव घेतली. या बाळाला बालकल्याण समिती शिशुगृहात पाठविणार असल्‍याची माहिती आहे. महिला पोलिसांनी या बाळाला कुशीत घेतले तेव्‍हा ते हसतच होते. या प्रकारानंतर रुग्णालयातील महिला तसेच नागरिकांनी निष्ठुर आईच्या कृत्यामुळे हळहळ व्यक्त केली.