आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पाचशेच्या नोटांअभावी अडले चिल्लर व्यवहार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - जुन्या चलनबंदीला १५ दिवस झाल्यानंतर शहरातील बँक, एटीएमवरील गर्दी काहीशी कमी झाली असली तरी ५०० रु.ची नवी नोट अद्याप शहरात आली नसल्यामुळे सामान्य ग्राहकांना हजार रु.ची चिल्लर मिळेनाशी झाली आहे. त्यामुळे त्यांचे चिल्लर व्यवहार बऱ्याच मोठ्या प्रमाणात अडले आहेत.
१०० रु.च्या नोटा जरी एटीएममध्ये मिळत असल्या तरी त्यांची संख्या मर्यादित आहे. ग्राहकांना सध्या जास्तीत जास्त हजार रु.च्या नोटा एटीएमद्वारे तसेच बँकांमधून मिळत आहे. त्यामुळे दोन हजाराच्या चिल्लरचा तुटवडा निर्माण झाला असून जोवर चिल्लरची सोय होत नाही तोवर भाजी, किराणा, दुध, दही यासारखे जीवनावश्यक पदार्थ खरेदी करता येत नाही. त्यामुळे चिल्लर व्यवहार अडले आहेत. ग्राहक बँकांमध्ये चिल्लरची मागणी करीत असले तरी त्यांना जे मिळेल ते घ्या असे सांगितले जात आहे.

प्रत्येक ठिकाणी दोन हजाराची नोट घेऊन जाणे शक्य नाही. त्यामुळे ग्राहकांच्यापुढे एकतर फारच आवश्यक असेल तेव्हा खरेदी करणे किंवा पूर्ण दोन हजार रु.ची खरेदी करणे एवढाच पर्याय आहे. पेट्रोल पंपावरही ग्राहक चिल्लर करण्यासाठी गेले तर त्यांना किमान २०० ते ३०० रु.चे पेट्रोल घ्या असे सांगितले जात आहे. ऐरवी पेट्रोल पंप ही चिल्लर मिळण्याची हमखास जागा आहे. परंतु, आता तेथेही चिल्लर मिळेनाशी झाली आहे. कारण १०० रु. फारच जपून खर्च केले जात आहेत.

आता ग्राहक ५०० रु.चे नवे चलन केव्हा बँकांमध्ये येते याची आतुरतेने वाट बघत आहेत. व्यवहारासाठी ५०० रु.ची नोट सोयीस्कर असल्याचे मत बहुतेक ग्राहकांनी व्यक्त केले. वारंवार मागणी करूनही आरबीआयने अद्याप शहरात ५०० रु.ची नोट पाठवली नाही. या नोटांची संख्या मर्यादित असल्यामुळे महानगरांमध्येच या नोटा पाठवल्या जात आहे. याही आठवड्यात शहरात ५०० च्या नोटा येण्याची शक्यता कमीच आहे. आता त्या पुढच्या आठवड्यातच येतील, अशी माहिती शिखर बँक प्रबंधकांनी दिली.

जिल्ह्यात३५० कोटींच्या नव्या चलनाचे वाटप : गत१४ दिवसांत जिल्ह्यात ३५० कोटी रु.च्या १०० हजार रु.च्या नव्या चलनाचे वाटप करण्यात आले तेथेच १२५० कोटी रु. ग्राहकांनी जमा केले. त्यामुळे एवढ्या कमी कालावधीत माेठ्या संख्येत बँकांना रक्कम उपलब्ध झाली आहे. रिझर्व्ह बँकेने रक्कम काढण्याची मर्यादा ठरवून दिल्यामुळे तसेच प्रारंभी पाच दिवस एटीएम सेवा पुर्णपणे ठप्प पडल्यामुळे ग्राहकांना मोठ्या प्रमाणात पैसे काढता आले नाही.

पर्यायी सिस्टीमला प्राधान्य द्यावे
^चलनातील नोटांचा आरबीआयकडून मर्यादित पुरवठा होत असतानाही पारंपरिक पद्धतीनेच व्यवहार सुरू आहेत. जर ग्राहकांनी पर्यायी सिस्टीमला प्राधान्य दिले तर त्यांचे काम आणखीनच सोपे होईल. सुनीलरामटेके, शिखर बँक प्रबंधक
बातम्या आणखी आहेत...