आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आम आदमी पक्षाची जिल्हा कचेरीवर धडक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- जिल्हासामान्य रुग्णालयात(इर्विन) मागील अनेक वर्षांपासून सिटी स्कॅन मशीन बंद पडली आहे. ही सुरू करण्यासंदर्भात आपने यापूर्वी मुख्यमंत्री आणि पालकमंत्री यांना निवेदन दिले आहे, मात्र ती सुरू झाली नाही, यासह इतर महत्त्वाच्या मुद्द्यांवर आपने आक्रमक भूमिका घेतली आहे. या मागण्यांच्या पूर्ततेसाठी सोमवारी (दि. १७) आपने जिल्हा कचेरीवर मोर्चा आणला होता. तत्पूर्वी आपच्या काही पदाधिकाऱ्यांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
नांदगाव पेठ एमआयडीसी परिसरातील आलेल्या टेक्सटाईल झोनमध्ये स्थानिकांना रोजगारासाठी प्राधान्य देण्यात यावे, त्यासाठी स्थानिक युवकांना प्रशिक्षण द्यायला पाहिजे. जिल्ह्यातील अनेक कंपन्यांमध्ये कार्यरत असलेल्या कामगारांना किमान वेतन कायद्यानुसार वेतन मिळायला पाहिजे, कृषी जोडणीसाठी अनेक शेतकऱ्यांनी विद्युत विभागाला रकमेचा भरणा केला आहे. मात्र अद्याप अनेक शेतकऱ्यांना वीज मिळालेली नाही. वीज मिळाल्यास शेतकऱ्याला पाण्याची सुविधा शेतीसाठी उपलब्ध होईल, पर्यायाने आत्महत्या रोखल्या जाईल. जिल्हा सामान्य रुग्णालयात अमरावती जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातूनही रुग्ण उपचारासाठी येतात. मात्र याठिकाणी असलेली सिटी स्कॅन मशीनमागील अनेक महिन्यांपासून बंद अवस्थेत आहे, ती सुरू झाल्यास रुग्णांना मोठा आधार होईल, त्यामुळे सिटी स्कॅन मशीन सुरू व्हायला पाहिजे, अशीही मागणी या वेळी करण्यात आली होती. यासह अन्य मागण्यांसाठी आम आदमी पार्टीने सोमवारी जिल्हा कचेरीवर मोर्चा आणला. या मोर्चामध्ये अनेक कार्यकर्ते हजर होते.
मोर्चामध्ये सहभागी झालेले आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते.