आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमिरच्या फाउंडेशनचे अाता पाणलोट अभियान, ३० तालुक्यांत राबवणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - दुष्काळावर मात करण्यासाठी अभिनेता आमिर खानच्या ‘पाणी फाउंडेशन’च्या वतीने पुढच्या वर्षी राज्यातील ३० तालुक्यांमध्ये श्रमदानातून पाणलोट अभियान राबवले जाईल. त्यात विदर्भ आणि मराठवाड्यातील अनेक तालुक्यांचा समावेश राहील, अशी माहिती पाणी फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सत्यमेव जयतेचे दिग्दर्शक सत्यजित भटकळ यांनी दिली.

महाराष्ट्रात दुष्काळाचे चटके बसत असल्यामुळे अामीर खानच्या पाणी फाउंडेशनच्या वतीने गेल्या वर्षी राज्यातील तीन तालुक्यांमधील ११६ गावांमध्ये श्रमदानातून पाणलोट अभियान राबवण्यात आले. त्याचे सकारात्मक परिणाम दिसून आले. पाण्याच्या तुटवड्यावर मात करताना सुमारे १३६८ कोटी लिटर एवढ्या मोठ्या प्रमाणात पाण्याची साठवणूक करण्यात यश आले होते, असेही त्यांनी सांगितले. प्रयास संस्थेच्या वतीने चिटणवीस सेंटर येथे ‘आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना’ या उपक्रमाअंतर्गत आयोजित मुलाखतीत भटकळ यांनी आगामी योजनांची माहिती दिली. ‘सत्यमेव जयते’ या टीव्ही शोची पार्श्वभूमी सांगताना भटकळ म्हणाले की, ‘अनेक बड्या अभिनेत्यांनी छोट्या पडद्यावर पदार्पण केलेय. त्यामुळे आमिरलाही त्याबाबत विचारणा झाली होती. अनेक जण त्याच्याशी संपर्क साधत होते. आमिरनेही नंतर काम करण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्यातून समाजासाठी काहीतरी ठोस काम करण्याचे त्याच्या मनात आले आणि तेथेच ‘सत्यमेव जयते’ शोची संकल्पना उदयास आली. सतत चार महिने आम्ही भारतभ्रमण करीत राहिलो. त्यातून शोच्या विषयांची कल्पना येत गेली आणि तो सुपरहिट झाला. शो बंद करताना आम्हाला महत्त्वाच्या विषयाला हात घालायचा होता. त्यामुळे आम्ही पाण्याच्या प्रश्नाला प्राधान्य दिले. पाणी फाउंडेशनचा जन्मही त्यातूनच झाला. आता येत्या चार-पाच वर्षांत राज्यातील प्रत्येक गाव टँकरमुक्त व्हावे असा संकल्प अामच्या फाउंडेशनने केला असल्याचे भटकळ यांनी सांगितले. दुष्काळाचे चटके साेसल्यानंतर तरी लोकांमध्ये पाण्याबाबत जागृती निर्माण व्हावी, अशा संस्थांची गरज भासू नये, असे मतही भटकळ यांनी व्यक्त केले.
जनजागृतीची गरज
‘घरात लेखनाचे वातावरण होते. त्यामुळे लहानपणापासूनच मला साहित्याची आवड होती. पुस्तकांचे दुकानही होते. खरे मात्र आम्ही स्वतःच साहित्यात रमलो असल्याने व्यवसायाकडे फारसे लक्ष देता आले नाही’, असे भटकळ यांनी स्वत:विषयी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...