आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संघाचा गणवेश बदल दसऱ्यापर्यंत अमलात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या राजस्थानमध्ये झालेल्या प्रतिनिधी सभेत गणवेश बदलाचा निर्णय घेण्यात अाला अाहे. ऑक्टोबर महिन्यात विजयादशमीच्या उत्सवापर्यंत हा बदल अमलात आणला जाईल, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने बुधवारी नागपुरात जाहीर करण्यात आले.

खाकी हाफपँटऐवजी तपकिरी रंगाचा फुलपँट गणवेश म्हणून वापरण्याचा निर्णय संघाने अलीकडेच घेतला आहे. संघाचे विदर्भ प्रांत कार्यवाह दीपक तामशेट्टीवार यांनी प्रतिनिधी सभेच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयाची माहिती बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी बोलताना त्यांनी विजयादशमी उत्सवापर्यंत गणवेश बदलावर अंमल होणार असल्याचे सांगितले. तथापि, संपूर्ण देशात हा बदल घडून यायला दोन वर्षे लागतील, असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला.
मागील वर्षभरात देशभरात १५ हजार युवक ऑनलाइन नोंदणीच्या माध्यमातून संघाशी जुळले अाहेत. वर्षभरात संघाच्या एकूण शाखांमध्ये ५ ५३४ शाखांची भर पडून संख्या ५६ हजार ८५९ वर पोहोचली असल्याचे तामशेट्टीवार म्हणाले.
बातम्या आणखी आहेत...