आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुचाकीवरून पडल्याने युवकाचा झाला मृत्यू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - मागचे चाक पंक्चर झाल्यामुळे मावसभावाच्या दुचाकीवर मागे बसलेला एक २७ वर्षीय युवक दुचाकीवरून खाली कोसळला. या अपघातात त्याचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (दि. २३) दुपारी अमरावती ते चांदूर बाजार मार्गावरील नया अकोला ते जळतापूर फाट्यादरम्यान घडली आहे. आशिष प्रकाशराव कातोरे (२७, रा. जळका हिरापूर) असे मृतक युवकाचे नाव आहे. आशिष त्याचा मावसभाऊ ज्ञानेश्वर फेंडर (रा. जळका हिरापूर) हे दोघे दुचाकीने डिझेल घेण्यासाठी वलगावला आले होते. ज्ञानेश्वर यांच्याकडे ट्रॅक्टर असल्यामुळे ते वलगाववरून एका कॅनमध्ये डिझेल घेवून गावाकडे परत जायला निघाले होते. भरलेली कॅन पकडून आशिष मागे बसला होता. वलगावपासून काही अंतर पुढे आल्यानंतर या मार्गावर प्रचंड खड्डे पडले आहे, याच खड्ड्यामुळे ज्ञानेश्वर यांच्या दुचाकीचे मागील चाक पंक्चर झाले एकाएकी दुचाकीवर मागे बसलेल्या आशिषचा तोल जाऊन तो रस्त्यावर पडला. यामध्ये आशिषच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. असे आशिषचे नातेवाईक ग्रामस्थ सांगत होते. अपघात झाल्यावर आशिषला इर्विन रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान आशिषचा मृत्यू झाला. 
बातम्या आणखी आहेत...