आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यंदा मराठी साहित्य संमेलन नेमके कोठे, डोंबिवलीचे होणार का ‘कल्याण?’

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - अ. भा. मराठी साहित्य संमेलन यावर्षी नेमके कोठे होणार, या विषयी साहित्य रसिकांना उत्सुकता लागून असली तरी या विषयीचा निर्णय वा पुढील दिशा पुणे येथे रविवार १८ ला होणाऱ्या महामंडळाच्या बैठकीत ठरेल, अशी माहिती महामंडळाचे अध्यक्ष डाॅ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी दिली. संमेलनासाठी डोंबिवली येथील आगरी युथ फोरम, कल्याणमधील सार्वजनिक वाचनालय, बेळगाव, अमरावती जिल्ह्यातील रिद्धपूर, चंद्रपूर जिल्ह्यातील तळोधी तसेच मसाप, पुणेच्या सातारा व इंदापूर शाखांनी निमंत्रणे दिली आहे.

आज स्थळ पाहणी : महामंडळाची स्थळ निवड समिती उद्या शुक्रवार १६ ला डोंबिवली व कल्याण येथील जागांची तर १७ ला बेळगाव येथे जाऊन पाहणी करणार आहे. आयोजक संस्थेची क्षमता, आयोजकांची योजकता, संमेलन कसे आयोजित करणार?, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच सर्वात महत्वाचे आर्थिक नियोजन यासाठी संस्थांची असलेली तयारी या बाबींवर भर देण्यात येणार आहे. डोंबिवली येथील आगरी युथ फोरमने मागील वर्षीही निमंत्रण पाठवले होते. मात्र त्यावेळी पिंपरी-चिंचवडची निवड करण्यात आली होती. त्यामुळे यावेळी आगरी युथ फोरम आग्रही आहे. कल्याणचेही प्रयत्न असल्याने एखादेवेळी संयुक्त आयोजन केले जाऊ शकते मात्र या संबंधीचा निर्णय १८ च्या बैठकीत होईल, असे महामंडळाच्या सूत्रांनी सांगितले.
िवदर्भात अलीकडे नागपूर आणि चंद्रपूर येथे साहित्य संमेलने झाली. त्यामुळे यावर्षी संमेलन िवदर्भात होण्याची शक्यता कमी दिसते. कालावधीचा विचार केल्यास बृहन्महाराष्ट्रात आतापर्यंत एकही संमेलन झाले नाही, याकडे सूत्रांनी लक्ष वेधले.
बातम्या आणखी आहेत...