आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिलांनी उतरवली ‘नशा’, तळेगाव ठाकूर येथे १४ वर्षांच्या लढ्यानंतर देशी दारूचे दुकान बंद

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तिवसा - गावातील भरवस्तीत असलेले देशी दारूचे दुकान बंद करण्यासाठी महिलांनी एकजुटीने पुकारलेल्या तब्बल चौदा वर्षांच्या लढ्याला बुधवारी (दि. १४) यश आले. विविध आंदोलनानंतर दुकान बंदीसाठी आज आयोजित केलेल्या ग्रामसभेत तब्बल ६० टक्के महिलांनी उपस्थित राहून दुकान बंदच्या बाजूने सह्या केल्या. त्यामुळे महिलांनी निर्माण केलेल्या शक्तीने दारूच्या दुकानाची ‘नशा’ एका झटक्यात कायमचीच उतरवून टाकली. अधिकाऱ्यांनी दुकानबंदीची घोषणा केल्यानंतर गावकऱ्यांनी मिठाई वाटून फटाके फोडून मोठा जल्लोष केला. त्यामुळे राष्ट्रसंताची ग्रामगीता, त्यांनी केलेल्या प्रबोधन आज खऱ्या अर्थाने सार्थकी लागल्याचे समाधान ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर झळकत होते. 
 
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची कर्मभूमी असलेल्या मोझरी येथून केवळ चार किमी अंतरावर असलेल्या तळेगाव ठाकूर येथे भरवस्तीत असलेले दारूचे दुकान बंद व्हावे यासाठी महिलांनी २००३ पासून लढा उभारला होता. 

या दरम्यान अनेक निवदने, आंदोलने सुद्धा करण्यात आले होते. त्यावेळी मतदानही घेण्यात आले होते. परंतु मतदान कमी झाल्याने राष्ट्रसंताच्या भूमीत दारूचा विजय होऊन दुकान कायम राहिले होते. परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर इतर ठिकाणचे बार दारुची दुकाने बंद झाल्याने गावातील भरवस्तीत असलेल्या या दुकानावर तळीरामांची तोबा गर्दी वाढली होती. मद्यपींच्या धुमाकुळामुळे महिलांचे या मार्गाने जाणेही कठीण झाले होते. गावातील महिला कमालीच्या संतापल्या होत्या. त्यामुळे महिलांनी कमालीची एकजूट करून दुकान कायमस्वरूपी बंद व्हावे यासाठी निकराचा लढा देण्यासाठी पदर खोचला होता. यासाठी महीलांनी जिल्हाधिकाऱ्यांसह सबंधित अधिकाऱ्यांना निवदने दिली होती. परंतु त्यानंतरही काहीच कार्यवाही होत नसल्याचे पाहून महिलांनी अखेर प्रशासनाला इशारा देऊन मागील आठवड्यात शोले आंदोलन केले. त्यानंतर पाच दिवस दुकान बंद ठेवून बुधवारी ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. सुमारे १५ हजार लोकसंख्या असलेल्या गावात दारूचे दुकान बंद करण्यासाठी मतदार यादीत नाव असलेल्या जवळपास पाच वार्डातील २२७० मतदार महिलांपैकी ५० ट्कके महिलांनी ग्रामसभेत उपस्थित राहून स्वाक्षरी करणे आवश्यक होते. परंतु आज झालेल्या ग्रामसभेत स्वाक्षरी अभियानात १४१२ महीलांनी दुकानाला विरोध दर्शवत सहृया केल्या. आज सकाळी वाजता पासून महीला शेतातील कामाला जाता थेट दारू दुकाना विरोधात स्वाक्षरी करण्यासाठी सभेला उपस्थित होत्या. चार वाजता सबंधीत अधिकाऱ्यांनी ग्रामसभा सुरू केली. त्यानंतर दुकान बंद करण्यासाठी वाजता ठराव मंजूर करून दूकान कायमस्वरूपी बंद झाल्याची घोषणा केली. यावेळी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे लांडगे, नायब तहसीलदार वाळवे , मंडळ अधिकारी नंदू मधापुरे, पं.स.चे विस्तार अधिकारी पुनसे, सरपंच श्रीकृष्ण बांते, उपसरपंच सतीश पारधी, ग्रामसेवक गजानन खारोडे, पोलीस पाटील दिवे यांच्यासह हजारो महीला पुरूष उपस्थित होते. 

गावातफटाके मिठाई वाटून जल्लोष: दारुचेदुकान बंद करण्यासाठी सातत्याने १४ वर्ष लढा दिलेल्या या लढाईला आज यश आल्याने गावकऱ्यांनी फटाक्यांची आतषबाजी केली. यासोबतच मिठाई वाटून जल्लोष साजरा केला. 

^नवीन नियमानुसारग्रामसभेत दारूबंदीसाठी ५० टक्क्याहून अधिक महिलांची उपस्थिती असल्यास दुकान बंद कायमस्वरुपी बंद करता येते. त्यामुळे आता मतदान घेण्याची गरज नाही. -नंदू मधापुरे, मंडळ अधिकारी 

^५० टक्केपेक्षा जास्त मतांनी दारू दुकान बंद होण्यासाठी ठराव मंजूर झाला आहे. यानंतर दुकान सुरू राहणार नाही हे आपल्याला वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. ठराव जिल्हाधिकाऱ्यांना पाठवू गजाननखारोडे - ग्रामसेवक, तळेगाव ठाकूर 

एक रजिस्टरमुळे त्रास 
दुकान बंद करण्यासाठी ग्रामसभेत एकाच रजिस्टर वर स्वाक्षऱ्या कराव्या लागत होत्या. ग्रामसभेत महिलांची तोबा गर्दी झाल्याने महिलांना कमालीचा त्रास सहन करावा लागला. परंतु दुकान बंदीसाठी महिलांनी एकजुटीने सर्वच त्रास सहन केल्याचे आज दिसून आले. 

आनंद गगनात मावेना 
^देशीदारू दुकान हटविण्यासाठी आजपर्यंत कधीच महिलांची एवढी एकजूट पाहिली नाही.सर्वांच्या एकजुटीमुळे लढा यशस्वी ठरला. आमचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. या लढ्यात सर्वांचा सहभाग होता. -सुनंदा दिवे,आंदोलनकर्ती महिला. 

दारूपासून मुक्ती 
^दारुच्यादुकानामुळेखुप त्रास सहन करावा लागला. पोटाची पर्वा करता आंदोलन केले. आज दुकान कायमस्वरुपी बंद झाल्याने दारूपासून आम्हाला कायमची मुक्ती मिळाली,याचे सर्व महिलांना समाधान आहे. संगीताहाके, आंदोलनकर्ती महिला . 

रात्र काढली जागून 
काही वर्षापुर्वी दारू बंदीसाठी झालेल्या मतदानादरम्यान दुकानदाराकडून पैसे वाटण्याचा प्रकार घडला होता. हा प्रकार पुन्हा घडू नये म्हणून महिलांनी चौका चौकात खडा पहारा देत मंगळवारची संपूर्ण रात्र जागून काढली होती. यावरून महिलांचा पक्का निर्धार स्पष्ट होत होता. 
 
बातम्या आणखी आहेत...