आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वर्षभरात दारूचे 1096 गुन्हे, 455 आरोपींना अटक, चारचाकी, 18 दुचाकी वाहने जप्त

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यवतमाळ - अवैध मद्याविरोधात जिल्ह्यात धडक मोहिम राबविण्यात येत आहे. जिल्हाधिकारी उत्पादन शुल्क आयुक्तांच्या निर्देशाप्रमाणे होत असलेल्या या मोहिमेत गेल्या केवळ एका वर्षात ठिकठिकाणी धाडसत्र राबवून आरोपींविरुद्ध १०९६ गुन्हे दाखल करण्यात आले आहे. या कार्यवाहीत एकूण ४५५ आरोपींना अटक करण्यात आली.
 
अवैध मद्य विक्रीला चाप लावण्यासोबतच अवैध वाहतूक, निर्मितीवरही प्रतिबंध घालण्यात येत आहे. गेल्या वर्षभरात मार्च अखेरपर्यंत राबविलेल्या मोहिमेत धडक कार्यवाही करण्यात आली आहे. एप्रिल २०१६ पासून ३१ मार्च २०१७ पर्यंत विविध कार्यवाहीत उत्पादन शुल्क विभागाने हजार ९६ गुन्हे नोंदविले आहे. या कार्यवाहीत ४५५ आरोपींना अटक करण्यात आली. वेगवेगळ्या धाडीत चार चारचाकी वाहने १८ दुचाकी वाहने जप्त करण्यात आली. एकूण ६४ लाख रुपयांची अवैध दारू नष्ट करण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली कायदा सुव्यवस्थेची बैठक झाली. यासोबतच जंगल भागात हातभट्टीची निर्मिती सुरू असल्यास अशा हातभट्टीवर तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले असून त्यानुसार अशा ठिकाणी राज्य उत्पादन शुल्क पोलिसांनी संयुक्त कार्यवाही करावयाची असल्याचे उत्पादन शुल्क अधीक्षक पराग नवलकर यांनी कळविले आहे. 
 
न्यायालयाच्या निर्देशाने ३०९ दुकाने बंद : सर्वोच्चन्यायालयाने एका प्रकरणात निर्णय देतांना राज्य महामार्गालगतची ठराविक अंतरावरील मद्य विक्री दुकाने बंद करण्याचे निर्देश दिल्याने जिल्ह्यातील अशी ३३३ मद्यविक्री दुकाने बंद करण्यात आली आहे. अंतर मोजणीसाठी समिती गठीत करण्यात आली होती. समितीच्या अहवालानुसार बंदची कार्यवाही करण्यात आली. ज्या गावांची लोकसंख्या वीस हजार किंवा त्यापेक्षा कमी आहे, अशा गावाच्या ठिकाणी २२० मीटर अंतरावरील मद्य दुकाने सुरू ठेवण्याचे निर्देश असल्याने यापैकी २४ दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे बंद करण्यात आलेल्या दुकानांची संख्या ही आता ३०९ इतकी आहे. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...