आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एल्गार : दारूबंदीसाठी गावागावांत जनक्षोभ, दारू विक्री करणाऱ्यांचे महिलांनी फुंकले कान

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गावातील झेंडा चौकातील जे देशी दारूचे दुकान बंद करण्यासाठी महिला एकवटल्या आहेत, त्याच देशी दारूच्या दुकानासमोर प्रजासत्ताक दिन स्वातंत्र्य दिनी झेंडा वंदन केले जाते. - Divya Marathi
गावातील झेंडा चौकातील जे देशी दारूचे दुकान बंद करण्यासाठी महिला एकवटल्या आहेत, त्याच देशी दारूच्या दुकानासमोर प्रजासत्ताक दिन स्वातंत्र्य दिनी झेंडा वंदन केले जाते.
कोकर्डा - दारूबंदीच्या विरोधात दिवसेंदिवस गावोगावी जनक्षोभ उसळत असल्याचे दिसून येत आहे. घराघरात अवदसा घुसवणाऱ्या भर बाजारपेठेत सुरू असलेले येथील दारूचे दुकान बंद करण्यात यावे या मागणीसाठी दुकानासमोर परिसरातील चार गावांतील शेकडो महिलांनी एकजुटीने सोमवारी (दि. २२) भर उन्हात ठिय्या आंदोलन सुरू केले. जोपर्यंत दारूचे दुकान बंद होणार नाही, तोपर्यंत येथून हटणार नाही असा पवित्रा महिला आंदोलकांनी घेतला होता. विशेष म्हणजे याच दारूच्या दुकानासमोर गणराज्य स्वातंत्र्य दिनी ध्वजारोहण करून विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. 
 
काेकर्डा येथे गावाच्या भर वस्तीत गेल्या ४० वर्षांपासून एम. एस. नाईक यांचे देशी दारूचे दुकान आहे. या दुकानासमोर तळीरामांची वर्दळ राहत असल्यामुळे परिसरातील महिला युवतींना तळीरामांकडून होणाऱ्या सततच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. वर्षभरापुर्वी झालेल्या ग्राम सभेमध्ये गावातील या दुकानाला बंद करण्यासाठी ठराव घेण्यात आला होता. या वर्षी नुकत्याच झालेल्या ग्राम सभेमध्ये दुकान गावाच्या बाहेर स्थलांतरीत करण्याचा ठराव घेण्यात आला. तंटा मुक्त समितीचे अध्यक्ष श्रीकृष्ण सावरकर हे गावातील दारूचे दुकान बंद व्हावे म्हणून सातत्याने प्रयत्न करीत आहेत. परंतु अद्यापही दुकान बंद होऊ शकल्याने अखेर महिलांनी पुढाकार घेत दुकान बंद करण्यासाठी सोमवारी दुपारपासून दुकानासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले. दुकान मालक नाईक यांनी त्वरीत दुकानाला कुलूप ठोकले. परंतु त्यामुळे आंदोलनकर्त्या महिला ग्रामस्थांचे समाधान झाले नाही. या आंदोलनात कोकर्डा, शेंडगाव, ब्राह्मणवाडा, देऊळगाव परिसरातील जवळपास दीडशे ते दोनशे महिला सहभागी झाल्या होत्या. या दुकानाच्या बंदीसाठी यापुर्वी शेंडगाव येथील महिलांनी ठराव घेतला होता. त्यासंदर्भात त्यांनी तहसीलदार, जिल्हाधिकारी, अन्न औषध प्रशासन, खल्लार पोलिसात निवेदनही दिले होते. या प्रकरणी नायब तहसीलदार एम. डी. चव्हाण यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता, महिलांनी दारूचे दुकान कायम स्वरुपी बंद करण्याचा मुद्दा लावून धरला. प्रशासन एसडीपीओ सचिन हिरे यांनीही मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. परंतु महिला आपल्या मतावर ठाम राहिल्या. दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दुकान सील झाल्याशिवाय हटणार नसल्याचा पावित्रा महिलांनी घेतला असून दुपारपासून सुरू झालेले हे ठिय्या आंदोलन महिलांची नारेबाजी रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
 
त्रासाचा करावा लागतो सामना 
- शालेय विद्यार्थिनी विद्यार्थ्यांना दारूच्या दुकानासमोरूनच जावे लागते. त्यामुळे त्यांना मोठा त्रास सहन करावा लागतो. परिसरातील लहान लहान मुलेही दारूच्या आहारी जात आहेत.
’’ निर्मलाइंगळे, आंदोलक 

दुकानासमोर ध्वज वंदन लाजीरवाणे 
- या दारूदुकानामुळे महिला,युवतींना त्रास होत आहे. हे दारू दुकान गावात झेंडा चौकात आहे. प्रजासत्ताक, स्वातंत्र्य दिनी या दुकानासमोरच झेंडा वंदन करावे लागते. हे लाजिरवाणे आहे.
’’ भूमिका इर्स, आंदोलक

गाडगे महाराजांच्या भूमित दारू दुकान 
- अनेक महिलांचे संसार उघड्यावर आले. खेदाची बाब ही की,कर्मयोगी गाडगे बाबांनी व्यसनांपासून दूर राहण्यास प्रयत्न केले त्यांच्या जन्म भूमीपासून ते दीड कि.मी.वर हे दुकान आहे.
-कमला माहोरे, आंदोलक 

गावकऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न 
- आंदोलनकर्त्यामहिलांचीसमजूत काढत कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करता जिल्हाधिकारी, उत्पादन शुल्क अधीक्षकांना भेटून ग्राम सभेच्या मार्गाचा अवलंब करून प्रश्न सोडवण्याचे आवाहन केले.
’’ सचिनहिरे, एसडीपीओ 

दारूचे दुकान बंद झालेच पाहिजे 
-जोपर्यंतयागावामधील दारूचे दुकान कायम स्वरुपी बंद होणार नाही, तोपर्यंत गावातील महिला येथून मागे हटणार नाहीत. दारूबंदीसाठी आता सर्व महिला एकवटल्या आहेत.’’ -प्रतिभा काटकर, आंदोलक 

दुकान बंदच्या कारवाईचे पत्र 
- महसुलच्यावतीनेसोमवारी देशी दारू दुकान बंद करण्यासाठी ग्राम पंचायत स्तरावर महिलांचे मतदान घेऊन नियमानुसार दुकान बंद करण्याच्या कारवाईबाबत पत्र दिले.’’
-एम. डी. चव्हाण, नायब तहसीलदार 
 
वरिष्ठांनी दिले आश्वासन 
- ग्रा.पं.,ग्रामस्थदारूचे दुकान बंद होण्याच्या बाजूने आहेत. तसा ग्रामपंचायतीचा ठराव आहे. नियमानुसार कारवाईचे नायब तहसीलदारांंनी ग्राम पंचायतीला अाश्वासन दिले.’’ -दादाराव खंडारे, सरपंच 
 
 पुढील स्लाइडवर वाचा,  दारू विक्री करणाऱ्यांचे महिलांनी फुंकले कान...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
बातम्या आणखी आहेत...