आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्वांनी पक्षभेद बाजूला ठेवले तर सहकारातील विकास सहज शक्य- आ.नजरधनेंचे प्रतिपादन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उमरखेड- सहकार क्षेत्र जो पर्यंत उर्जित राहणार नाही तोपर्यंत शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास होणार नाही. सहकार जे करू शकते ते सरकार करू शकत नाही तेव्हा सहकार क्षेत्राचा विकास पुढे न्यावयाचा असेल तर पक्ष भेद बाजूला सारून शेतकऱ्यांचा विकास तेवत ठेवण्यासाठी सर्वच पक्षातील प्रमुख नेत्यांनी एकत्रितपणा ठेवणे अत्यंत महत्वाचे आहे, असे प्रतिपादन मार्च रोजी तालुका शेतकरी जिनिंग प्रेसिंग संस्थेच्या कापूस प्रक्रिया आधुनिकीकरण स्वयंचलीत यंत्रणा उद्घाटन प्रसंगी या विभागाचे आ.राजेंद्र नजरधने यांनी कार्यक्रमाप्रसंगी काढले. 

१५ मार्च नंतरही शेतकऱ्यांसाठी नाफेडची तूर खरेदी सुरूच राहणार असल्याने शेतकरी बांधवांनी काळजी करण्याची मुळीच गरज नाही असे शेतकऱ्यांप्रती आशावादी विधानही नजरधने यांनी केले. स्थानिक तालुका शेतकरी जिनिंग प्रेसींग या संस्थेमध्ये कापूस प्रक्रिया आधुनिकीकरण स्वयंचलीत यंत्रणा प्रारंभ करण्यात आली या सेमी प्रक्रीया उद्योगाचे उद्घाटन आ.नजरधने यांचे हस्ते करण्यात आले. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी नगराध्यक्ष सुरेशचंद्र माहेश्वरी होते. 
 
कार्यक्रमाला माजी आमदार विजय खडसे, माजी नगराध्यक्ष राजु जयस्वाल, नंदकिशोर अग्रवाल, दत्तराव शिंदे, नारायणदास भट्टड, भीमराव चंद्रवंशी, महेश काळेश्वरकर, बाळासाहेब नाईक, सतीश वानखेडे, बाळासाहेब चंद्रे, किसनराव वानखेडे, दिलीप नरवाडे, प्रेमराव वानखेडे, ईनायतउल्ला जनाब, राम देवसरकर, ख्वाजा बेग, बळवंत नाईक, अॅड.बळीराम मुटकुळे, सहकार अधिकारी भागानगरे, विलास मोरे, खविस उपाध्यक्ष नारायण मोरे, आत्माराम शिंदे, सविता कदम, छाया धुळध्वज, रक्षा माने, पं.स. सभापती प्रयाग कोतेवार, संगीता वानखेडे, बाळासाहेब आगलावे सह अन्य मंडळी उपस्थित होती.
 
 सतत तिन वर्षाच्या कार्यकाळात संस्था संचित तोटयात वाटचाल करीत होती, शेतकरी विकासाला गती मिळवून देण्यासाठी कापूस प्रक्रिया उद्योग त्यासह पुरक उद्योग सुरू करणे गरजेचे होते. मागील सप्टेबर महिन्यात नवी संचालक मंडळ स्थापित झाल्यानंतर सहा महिन्याच्या कालखंडात हा उद्योग सर्व संचालकाच्या माध्यमातून राज्यात अभ्यास दौरा जावून आणि राष्ट्रीयकृत बँकांनी कर्ज पुरवठा नाकारल्या नंतरही संचालकांनी एकजुटीने येवून या उद्योग उभारणीसाठी ताकद दाखवून फक्त संस्थेच्या भांडवल बळावर कोटी रुपयाची गुंतवणूक करून प्रथम कापूस प्रक्रिया स्वयंचलीत यंत्रणा सुरूवात केली. त्याचा लाभ शेतकऱ्यांना होईल.
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...