आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमरावती - महापौर,उपमहापौर ठरले, 9 मार्चला होणार निवडणूक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - महापालिकेत एकहाती सत्ता प्राप्त झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाचे महापौर म्हणून संजय नरवणे तर उपमहापौरपदासाठी संध्या टिकले यांचे नाव निश्चित झाले आहे. तिजोरीची चाबी असलेल्या स्थायी समिती सभापती पदासाठी तुषार भारतीय तर पक्षनेता म्हणून सुनील काळे, उपपक्षनेता म्हणून विवेक कलोती यांच्या नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. भाजपच्या विरोधात काँग्रेसने उमेदवार दिल्याने महापौर उपमहापौर पदांसाठी मार्चला निवडणूक होणार आहे. 
 
महापालिकेत मागील २० वर्षांपासून काँग्रेसकडे असलेली सत्ता भारतीय जनता पक्षाने नुकत्याच झालेल्या निवडणुकीत हिसकावली. ऐवढेच नव्हे तर स्पष्ट बहुमताने भारतीय जनता पक्षाच्या नगसेवकांना मताधिक्काने महापालिकेत पाठविले.
 
संपूर्ण विरोधक एकीकडे आणि भाजप एकीकडे असे महापालिका सभागृहातील चित्र निर्माण झाले आहे. एकहाती सत्ता दिल्यानंतर भाजपाचा महापौर कोण होणार याकडे अमरावतीकरांचे लक्ष लागले होते.
 
 भाजपाच्या संसदीय बोर्डाच्या तब्बल शनिवारी (४ मार्च) मध्यरात्री पर्यंत चाललेल्या बैठकीत पदाधिकाऱ्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. बराच वेळ खल केल्यानंतर महापौर पदासाठी विलास नगर-मोरबाग प्रभागातून अनुसूचित जाती प्रवर्गातील राखीव जागेवरुन शिवसेना उमेदवाराला पराभूत करीत निवडूण आलेले संजय नरवणे यांचे नाव निश्चित करण्यात आले. संजय नरवणे यांनी ६७२८ मते मिळवित शिवसेनेचे परमानंद अहरवाल यांचा तब्बल ३७५३ मतांनी पराभव केला. 
 
महापौर पद अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव असून एकट्या भाजपचे तब्बल दहा नगरसेवक या प्रवर्गातून निवडूण आले आहे. स्पष्ट बहुमतात असलेल्या महापौर पदाचे दहा उमेदवार असल्याने भाजपसमोर पेच निर्माण झाला होता.
 
यामध्ये संजय नरवणे, विजय वानखडे, राधा कुरील, अनिता राज, गंगा अंभोरे, वंदना हरणे, इंदू सावरकर, सोनाली नाईक, अजय गोंडाणे, संजय वानरे यांचा समावेश होता. मात्र भाजपच्या कोअर कमिटीने खल केल्यानंतर संजय नरवणे यांच्या नावाचा या पदासाठी विचार केल्याचे दिसून येत आहे. 
 
शिवाय उपमहापौर पदासाठी बेनोडा-भिमटेकडी-दस्तूरनगर या प्रभागातून बसपाच्या सुजाता लांजेवार यांचा पराभव करीत निवडून आलेल्या संध्या टिकले यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. महापौर उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल करण्याची आज अंतिम तारीख होती, त्यामुळे भाजपच्या वतीने अर्ज दाखल करण्यात आले. काँग्रेसने महापौर तर काँग्रेस एमआयएमने उपमहापौर पदासाठी उमेदवार उभे केले आहे. 
 
- भाजपच्या कोअरकमिटीने महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सदस्य, पक्ष उपपक्षनेत्याची नावे निश्चित केली आहे. प्रदेश नेत्यांसोबत चर्चा करीत पदाधिकाऱ्यांच्या नावांबाबत निर्णय घेण्यात आला. जयंतडेहनकर, शहराध्यक्ष, भारतीय जनता पार्टी 
 
उपमहापौर पदाचे उमेदवार : संध्या सदाशिव टिकले - भाजप, अब्दूल वसीम मजीद - काँग्रेस, अफजल हुसैन मुबारक हुसैन - एमआयएम 

महापालिकेत आर्थिक निर्णय घेणारी स्थायी ही महत्वपूर्ण समिती आहे. एकूण १६ सदस्यीय असलेल्या या समितीला विचारात घेतल्या शिवाय महापालिकेतील कोणताही आर्थिक निर्णय होत नाही. त्यामुळे या समितीला महापालिकेची तिजोरी असे संबोधले जाते. या समितीच्या सभापती पदासाठी तुषार भारतीय यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे. 
बातम्या आणखी आहेत...