आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरातील ऐतिहासिक परकोटाच्या दुरुस्तीसाठी शासनाकडून 87 लाख

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ऐतिहासिक परकोटाच्या दुरुस्तीचे काम सुरू झाले आहे. - Divya Marathi
ऐतिहासिक परकोटाच्या दुरुस्तीचे काम सुरू झाले आहे.
अमरावती - शहराचीशान अन् ऐतिहासिक वारसा असलेल्या परकोटाच्या दुरुस्तीसाठी राज्य शासनाकडून ८७ लाखाचा निधी मंजुर करण्यात आला असून नुकतेच या परकाेटाच्या दुरुस्तीचे कामही पुरातत्त्वविभागाद्वारे सुरू केले आहे.
 
जुन्या अमरावती शहराभोवती असलेला हा परकोट अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार राहिला असल्यामुळे तो शहराच्या अस्मितेचे प्रतीक आहे. गत काही वर्षापासून या परकोटाची स्थिती दयणीय होती. त्याला लागूनच काही इमारती दुकाने थाटण्यात आल्यामुळे त्याला तडे गेले होते. अशा ऐतिहासिक परकोटाला नुकसानीपासून वाचवण्याची मागणी मनपाकडे होत होती.

नुकत्याच झालेल्या बैठकीत पालकमंत्र्यांनी परकोटाच्या दुरुस्तीसाठी शासनाकडून ८७ लाखाचा निधी उपलब्ध झाल्याची माहिती दिली होती. त्यामुळे लगेच दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले असून हा १७ व्या शतकात उमरावती शहराच्या रक्षणासाठी बांधलेला हा मजबूत परकोट नेहमीसाठी उभा असावा या उद्देशाने पुरातत्व विभागाच्या मदतीने त्यावर वज्रलेप लावण्याचे काम सुरू झाले आहे. या परकोटाला पाच दरवाजे आहेत. तसेच संपूर्ण भागच गर्दीने वेढलेला असतो. कधी शहर या परकोटाच्या आत वसले होते. मात्र आता शहराचा आकार वाढल्यामुळे हा परकोटच शहराच्या मध्यभागी आला आहे. याच्या आधाराने सर्वधर्मियांची मंदिरे प्रार्थना स्थळेही उभी आहेत. काही वर्षांपूर्वी परकोटाचे सौंदर्य वाढविण्याचे प्रयत्न झाले होते. त्याची दुरुस्ती करून त्यावर प्रकाश झोतही टाकण्यात आले होते. परंतु कालांतराने हे सौंदर्यीकरण शहरवासीयांच्या उदासीनतेमुळे नष्ट झाले. आता मात्र पुन्हा नव्याने परकोटाचे सौंदर्य खुलविण्याचा प्रयत्न होत आहे. त्यास शहरातील पुरातत्व विभागाचे अभ्यासक तसेच पर्यटनप्रेमी नागरिकांकडून स्वागत केले जात आहे. शहराच्या वैभवात भर घालणाऱ्या या इतिहासाच्या खुणा जपण्याचा प्रयत्न केला जात आहे. हा प्रयत्न कौतुकास्पद असाच आहे. 
परकोटाच्या सुरक्षेसाठी उभारण्यात आलेल्या लोखंडी कुंपणाला लागून फेरीवाले, फळविक्रेते तसेच भाजी विक्रेते त्यांची दुकाने थाटत होते. त्यांचा कचरा हा परकाेट कुंपणाच्या मध्ये सौंदर्यीकरणासाठी लावण्यात आलेल्या हिरवळीवर फेकला जात होता. त्यामुळे परकोटाचे सौंदर्यच नष्ट झाले होते. परंतु, गत चार िदवसांपासून अतिक्रमण हटाव मोहीम राबवून परकोटालगत उभे असलेले अतिक्रमण, फेरीवाले, फळ विक्रेते यांना दूर करण्यात आले असून मनपाने तेथे ‘नो पार्किंग झोन’चे फलक लावले. 
 
 
बातम्या आणखी आहेत...