आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमरावती: पराभूत उमेदवार समर्थक जाणार काळे झेंडे घेऊन जिल्हाकचेरीवर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बैठकीत उपस्थित आमदार बच्चू कडु ,माजी आमदार संजय बंड - Divya Marathi
बैठकीत उपस्थित आमदार बच्चू कडु ,माजी आमदार संजय बंड
अमरावती - महानगरपालिकेच्या ८६ जागांसाठी गुरूवारी (दि. २३) मतमोजनी पार पडली. यावेळी झालेल्या मतदानासाठी वापरण्यात आलेले ईव्हीएम पूर्णपणे सेट असल्याचा आरोप करून पराभूत उमेदवार त्यांच्या समर्थकांनी गुरुवारी सांयकाळपासूनच रोष व्यक्त केला आहे. दरम्यान शनिवारी (दि. २५) शहरातील अनेक पराभूत उमेदवार त्यांच्या शेकडो समर्थकांची गाडगे बाबा समाधी मंदिरात बैठक पार पडली. या बैठकिला आमदार बच्चू कडू, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय बंड प्रामुख्याने उपस्थित होते. कायदेशीर लढा देण्यासाठी न्यायालयात जाण्यासोबतच मार्चला जिल्हाकचेरीवर काळे झेंडे घेवून जाण्याचा निर्णय आजच्या बैठकित घेण्यात आला आहे. 
महापािलकेच्या निवडणूकीत अनेक प्रभागाचे धक्कादायक निकाल आले आहे, ज्या उमेदवारांची मतदारांना ओळखही नाही, त्यांना विजय मिळाला आहे. तसेच काही ठिकाणी ‘अ’ मशीनमध्ये हजार तर ‘ब’ मशिनमध्ये अडीच हजार मते असल्याचा आरोप यावेळी बैठकिला आलेल्या अनेक पराभूत उमेदवारांनी केला आहे. ही संपूर्ण मतदान प्रक्रीया पारदर्शक नव्हती. ईव्हीएम पुर्णत: सेट केलेल्या होत्या, असा धक्कादायक आरोप केला आहे. त्यामुळे संपूर्ण मतदान प्रक्रिया पुन्हा घेण्यात यावी, अशी एकसुरात मागणी बैठकित झाली आहे. त्यामुळेच आमदार संजय बंड, शिवसेनेचे महानगर प्रमुख सुनिल खराटे अन्य काही उमेदवारांनी उच्च न्यायालयात जाण्यासाठी वकीलाचा सल्ला घेतला आहे. यासोबतच मार्चला समर्थकांसह हातात काळा झेंडा घेवून जिल्हाकचेरी कार्यालयावर जाण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकिला अनेक पराभूत उमेदवार समर्थक उपस्थित होते. 
 
कायदेशीर लढा देऊ 
- प्रत्येकानेआपआपल्या निदर्शनास आलेल्या त्रुट्या कागदावर लिहून रविवारी सांयकाळपर्यंत जमा कराव्यात. जेणेकरून न्यायालयात लवकर जाता येईल. बच्चूकडू, आमदार 

१० दिवसाच्या आत न्यायालयात जावे 
- आम्ही वकीलांचा सल्ला घेतला आहे. मतमोजनीच्या दिवसापासून दहा दिवसांच्या आतमध्ये न्यायालयात याचिका दाखल करणे बंधनकारक आहे. संजयबंड, माजी आमदार, शिवसेना 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 
बातम्या आणखी आहेत...