आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आधुनिक साहित्याची भरमार, कर्मचाऱ्यांची मात्र मारामार; शहरातील अग्निशमन विभागातील परिस्थिती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - शहराचीस्मार्ट सिटीकडे वाटचाल, झपाट्याने होणारे औद्याेगिकरण, वाढत्या रहिवासी भूभागाचा विचार करता सध्या अग्निशमन विभागाकडे आग विझवण्यासाठी आवश्यक ती अत्याधुनिक यंत्रणा असली तरी मनुष्यबळाची मात्र उणीव आहे. ही उणीव कंत्राटी कर्मचारी भरून कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु, आगीसोबतच इतर आपातकालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळाची आवश्यकता भासत असते. ती भरून काढण्याचा प्रयत्न व्हायला हवा. तरच शहराची सुरक्षा पत्ती आपातकालीन स्थितीत कायम राहू शकते.
 
शहरात बडनेरा, वलगाव रोडवर उपकेंद्र झाल्यामुळे मुख्य अग्निशमन केंद्रातील कर्मचारी तिकडे वळवण्यात आले आहेत. त्यामुळे मुख्य केंद्रातच कर्मचाऱ्यांचा तुटवडा निर्माण झाला आहे. यापुढे जर कोणतेही नवे उपकेंद्र सुरू करण्यात आले तर मुख्य केंद्रावरील कर्मचारी हलवणे शक्य नाही. शहराचा आकार बघता येथे सर्वच मिळून एकूण ६५ कर्मचारी आहेत. तसेच ही २४ तासांची सेवा अाहे. त्यामुळे दिवस रात्र अशा दोन्ही शिफ्टमध्ये कर्मचारी कामावर हजर ठेवावे लागतात. यात सर्वच कर्मचारी एकावेळी उपस्थित असतील असेही नाही. अशात नवीन फायरमनची नियुक्ती करणे आवश्यक आहे. वाहन चालकांची उणीव कंत्राटी कर्मचारी भरून पूर्ण करण्याचा प्रयत्न झाला. परंतु, हे नियमित वाहन चालक नाहीत, अशी माहिती अग्निशमन विभागाच्या अधीक्षकांनी दिली. साहित्य वाढले आहे. परंतु, त्या तुलनेत कर्मचारी नाहीत, हे वास्तव आहे. आवश्यक त्या प्रमाणात कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली तर त्यांना नुसते बसवून ठेवावे लागेल. ते काही योग्य नाही. आपत्ती सांगून येत नाही. त्यामुळे आम्ही सदैव तत्पर असतो, असेही त्यांनी सांगितले.

मात्र अग्नीशमन ही असे सेवा आहे जी आधुनिक यंत्रांसह कुशल मनुष्यबळाने परिपूर्ण हवी. नागरिक शहराच्या सुरक्षेसाठी अग्नीशमन यंत्रणा ही सुसज्जित असणे आवश्यक आहे. त्यामुळे बसवून ठेवावे लागले तरी कर्मचारी तर हवेतच, सुरक्षेबाबत कोणताही धोका पत्करता येणार नाही, असे मत शहरातील सुजाण नागरिकांनी व्यक्त केले आहे.

जानेवारी २०१६ ते मार्च २०१७ या कालावधीत शहरात आगीच्या लहान, मोठ्या एकूण ४८४, अपघात ५२, सिलींडर लीकेज, स्फोट किंवा आगीच्या २५ अशा एकूण ५५८ घटनांमध्ये अग्नीशमन दलाने तातडीने हालचाल करून बचाव कार्य केले आहे. या कालावधीतील ४८४ आगीच्या घटनांमध्ये एकही जिवित हानी झाली नाही. अपघात इतर बचाव कार्यांतर्गत आलेल्या काॅल्सचा विचार करता १५ लोकांना वाचवण्यात यश आले, १३ जण मृत्यूमुखी पडले, १४ प्राण्यांना वाचवण्यात आले तर प्राणी मृत्यूमुखी पडले. सिलींडरशी संबंधित २५ घटनांमध्येही कोणतीही जिवित हानी झाली नाही. यादरम्यान शहरातील दोन मोठ्या आगीत ३१ मार्च २०१६ रोजी ३५ लाख रुपयांचे नुकसान झाले. यात कापसाचा ट्रक आजुबाजूचे शेत वाचवण्यात अग्नीशमन दलाला यश आले. त्याचप्रमाणे जुलै २०१६ रोजी अंजनगाव सुर्जी येथील सावकार पुऱ्यातील यशोवर्धन ट्रेडर्सचे १९०० रुईच्या गाठी जळून ३८ लाखाचे नुकसान झाले. आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.
 
अग्निशमन दल ही २४ तासांची सेवा
अग्निशमन ही२४ तासांची सेवा आहे. शहरात दोन उपक्रेंद्र उघडली असून तिसरे लवकरच उघडणार आहे. अशात मुख्य केंद्रातील कर्मचारी इतरत्र वळवणे शक्य नाही. अशात नवीन फायरमनची नियुक्ती करावी लागेल.’’ भरतसिंहचव्हाण, अधीक्षक अग्निशमन विभाग

विभागाकडे असलेले आधुनिक साहित्य
- हायड्रोलीक काॅम्बिटूल्स: रस्त्यावरीलअपघातात उपयोगी.
- रेस्क्यूक्रेन : रत्याच्याखाली उतरलेले क्विंटलपर्यंत वजन सहज उचलते.
- एअरजॅक : अपघातिकंवा इतर आपातकालीन स्थितीत उपयोगी.
- हायमास्टलाईट : पूरपरिस्थिती, अंधारात हवा भरून हा लाईट बलूनसारख वर जातो, भरपूर उजेड देतो.
- अग्निशमनगाड्या : बाहेरून३५ ते ४० फुटापर्यंत आग विझवण्यासाठी उपयोगी
- फोमटेंडर : रासायनिकउद्योगांसह इतर उद्योगांमधील आग विझवण्यास उपयोगी.
-  वाॅटरटेंडर : सर्वसाधारणआगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी.
बातम्या आणखी आहेत...