आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मनपाकडे तब्बल २७० कोटींची उधारी!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - महापालिकेकडे एक -दोन नव्हे तर तब्बल २७० कोटी रुपयांची देणी बाकी असल्याची बाब समोर आली आहे. उत्पन्नाचे स्त्रोत मर्यादीत असल्याने महापालिका आणखी आर्थिक संकटाच्या गर्तेत जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विविध विकास योजनेची सर्वाधिक ११२ कोटी तर कर्मचाऱ्यांशी संबंधित ६८ कोटी रुपयांची देणी बाकी आहे.
उत्पन्न नाममात्र आणि खर्च आभाळभर अशी महापालिकेची आर्थिक स्थिती झाली आहे. उत्पन्नाचे प्रमुख स्त्रोत नसल्याने खर्चाचा ताळेबंध करणे अधिकाऱ्यांना अडचणीचे ठरत आहे. मालमत्ता कराखेरीज अन्य कोणताही उत्पन्नाचा मोठा पर्याय महापालिकेकडे शिल्लक राहिलेला नाही. स्थानिक स्वराज्य संस्था असल्याने विविध विकास कामे, कर्मचाऱ्यांचे वेतन, कंत्राटदारांची देयके, दैनंदिन साफसफाई, नगरसेवकांचे मानधन, मुलभूत सुविधा आदी विविध कामांवर महापालिकेला मोठा निधी खर्ची घालावा लागतो. शासनाकडून महापालिकेला निधी मिळतो खरा, मात्र तो विशिष्ठ योजनेकरिता असल्याने इतरत्र खर्च करता येत नाही. शहरात बहुतांश विकास प्रकल्प सुरू करताना त्यामध्ये महापालिकेचा वाटा देणे गरजेचे असते. शासनाकडून मोठ्या प्रमाणात निधी मिळत असताना देखील महापालिकेला त्यांचा वाटा देणे देखील या आर्थिक टंचाईमुळे शक्य होत नसल्याचे चित्र आहे. महापालिकेचे प्रमुख उत्पन्नाचे साधन असलेली जकात तसेच रहदारी पास शासनाकडून बंद करण्यात आले. त्यानंतर स्थानिक संस्था कर लागू करण्यात आला. मात्र मागील दीड वर्षांपासून एलबीटी देखील बंद करण्यात आला. जकात किंवा एलबीटी आदी प्रमुख कर बंद करण्यात आल्याने महापालिकेचे प्रमुख उत्पन्नाचे साधन संपले आहे. या करातून महापालिकेला मोठ्या प्रमाणात उत्पन्न प्राप्त होत होते. यामधून कर्मचाऱ्यांचे वेतन, कंत्राटदारांची देयके आदी दिली जात होती. मात्र प्रमुख उत्पन्नाचा स्त्रोत बंद झाल्याने महापालिकेवर उधारी वाढविण्याची वेळ आली आहे.

तपशील रक्कम
कर्मचारीवेतन १.९० कोटी
शिक्षक वेतन ३.६० कोटी
सफाई कामगार वेतन १.१० कोटी
वेतन कपात देयके ३.७० कोटी
सहावे वेतन थकबाकी कोटी
सेवानिवृत्ती विक्री कोटी
कर्मचाऱ्यांचे सेनिव १२.५० कोटी
सेवा उपदान ६.५० कोटी
रोखीकरण कोटी
सुरक्षा रक्षक २१ लाख
नगरसेवक मानधन ७.५० लाख
दैनंदिन साफसफाई १.८७ कोटी
दैनंदिन कचरा उचलणे ३३ लाख
पाणीपुरवठा देयके १३ कोटी
विद्युत देयके १६ कोटी
उद्यान निगा राखणे लाख
पुरवठादार देयके ३८,३०,७३०
कंत्राटदार देयके १२ कोटी लाख,१४,६९४
जाहिरात देयके ५० लाख
भूसंपादन २५ कोटी
पाणीपुरवठा (निर्भय)४९.८८कोटी
पाणीपुरवठा टप्पा २८.५२ कोटी
नगरोत्थान समभाग ३०.४८ कोटी
नागरी स्वच्छता आराखडा ७.५०कोटी
इटीपी ५० लाख
विदर्भ वैधानिक १.४१ कोटी विकास मंडळ
युआयडीएसएसएमटी ३४.०५ काेटी
एकूण: २७० कोटी १२ लाख ९५ हजार ४२४ रुपये
बातम्या आणखी आहेत...