आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापालिकेचे पाऊल ‘कॅशलेस’च्या दिशेने

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - केंद्रराज्य शासनाद्वारे अनुदान योजनेंतर्गत मनपाच्या माध्यमातून राबवण्यात येत असलेल्या स्वच्छता योजनेंतर्गत प्रसाधनगृह अनुदान, घरकुल योजना अनुदान यासारख्या विविध योजना अन् विविध निर्माण कार्यांसाठी कंत्राटदारांना दिले जाणारे बिल तसेच आर्थिक व्यवहार आता थेट बँकांच्या माध्यमातून करणार आहे. महापालीकेला कॅशलेस व्यवहार कशाप्रकारे करता येईल, यासंदर्भात एचडीएफसी बँकेद्वारे मनपा आयुक्तांच्या कक्षात सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणालीचे सादरीकरण करण्यात आले. याप्रसंगी मनपा आयुक्त हेमंतकुमार पवार, अतिरिक्त आयुक्त सोमनाथ शेटे, कार्यकारी अभियंता संजय पवार, लेखापाल गुलशन मिराणी, प्रधानमंत्री आवास योजनेचे वसंत नाले, एचडीएफसी बँकेचे व्यवस्थापक राजकुमार पोजगे, ऐफाज मोहंमद, अमोल चुळबुळे, प्रदीप नितनवरे, विपिन त्रिवेदी, अमित शिरपूरकर आदी उपस्थित होते.
केंद्राच्या आदेशानुसार सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणाली अंमलात आणायची असल्यामुळे मनपाने त्यासाठी पुढाकार घेतला आहे. यासंदर्भात एचडीएफसी बँकेने मनपात बँकेमार्फत दिल्या जाणाऱ्या सर्व आॅनलाईन कॅशलेस बँकिंग प्रणालीची माहिती त्यांनी सादर केली. बँकेने नेफ्ट, आरटीजीएस, डायरेक्ट क्रेडीट, आधार ब्रिज पेमेंट सिस्टिम या सर्व सोयी कोणत्याही अतिरिक्त कराशिवाय मनपाला पुरविणार असल्याची हमी दिली. त्याचप्रमाणे बँकिंग अधिक सुलभ गतीमान करण्यासाठी बँकेतर्फे सुविधा दिल्या जातील, असे आश्वासन दिले. शासनाद्वारे मनपाला विविध योजनांसाठी मिळणाऱ्या निधीचे वितरण पूर्णपणे संगणकीकृत होणार असून त्यामुळे प्रशासनाच्या आर्थिक व्यवहारात मोठ्या प्रमाणात पारदर्शकता येईल. भविष्यात मनपा कॅशलेस आर्थिक व्यवहार करणार आहे. मनपा आयुक्तांनी ही प्रणाली राबवण्याच्या सुचना याप्रसंगी लेखा विभागाला दिल्या.
बातम्या आणखी आहेत...