आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एसएमएसद्वारे करता येणार तक्रार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - अमरावतीकर नागरिकांना आता एसएमएसद्वारे महापालिकेत तक्रार दाखल करता येणार आहे. तंत्रज्ञानाचा अवलंब करीत आधुनिक सुविधा देण्याचा प्रयत्न होत आहे. थेट तक्रार करण्याची सुविधा उपलब्ध झाल्याने पायाभूत समस्याची सोडवणूक होण्याची आशा पल्लवीत झाली आहे. 
 
महापालिका प्रशासनाकडून जनतेला नागरी सुविधा पुरविण्याचे कार्य केले जाते. पायाभूत सुविधांची सोडवणूक केली जात असून त्याची गती मंद असल्याने अनेकांना त्याचा फटका बसतो. वेळीस समस्याची दखल घेतली जात नसल्याने सामान्य नागरिकांना त्याचा मनस्ताप सहन करावा लागतो. ही बाब लक्षात घेता महापालिका प्रशासनाकडून एसएमएसच्या माध्यमातून समस्यांची सोडवणूक करण्याचे नियोजन केले आहे. एसएमएस कॅम्प्लेंट सिस्टीम’ सेवा सुरू करीत महापालिकेत नागरिकांच्या तक्रारी एसएमएसने स्वीकारल्या जाणार आहे. या प्रणालीचा वापर करीत संबंधित विभागास मोबाइलवरुन तक्रार करता येणार आहे. याकरीता प्रत्येक विभागाकरीता स्वतंत्र कोड तयार करण्यात आला आहे. मोबाइल कोड तसेच त्यानंतर तक्रारीचे वर्णन नागरिकांना द्यावे लागणार आहे. या प्रणालीमुळे नागरिकांच्या तक्रारी थेट संबंधित विभागाकडे पोहोचणार आहे. तक्रारीचे निराकरण होईपर्यंत तक्रारकर्त्यास एसएमएसद्वारे माहिती दिली जाणार अाहे. अशा प्रकारे नागरिकांच्या तक्रारीचे एसएमएसद्वारे निवारण करण्यात येणार आहे. या प्रणालीचा उपयोग करण्याचे आवाहन आयुक्त हेमंत पवार यांनी केले आहे. 

अशी नोंदवा तक्रार 
संबंधित विभागाचा कोड टाकत तक्रारीचे विवरण सोबत द्यावे लागणार आहे. कोडसह तक्रार लिहून झाल्यानंतर ९९७०००१३१२ या मोबाइल क्रमांकावर नोंदविता येणार आहे. 
बातम्या आणखी आहेत...