आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कामाला गती देण्यासाठी मनपात ३० नवे अभियंते, सगळी कामे अभियंता केंद्रितच

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती-रमाईआवास घरकुल दुरुस्ती योजनेची संथगती, वैयक्तिक शौचालय योजनेची ढिम्म प्रगती आणि बांधकाम क्षेत्रातील थांबलेला गाडा पुढे नेण्यासाठी मनपाच्या सेवेत लवकरच ३० नवे अभियंते समाविष्ट होत आहेत.
मानधन तत्त्वावर नियुक्त केल्या जाणाऱ्या या अभियंत्यांच्या नियुक्तीची फाइल तयार असून, त्यासाठीची निवडही जवळपास अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. आयुक्त म्हणून रुजू झाल्यानंतर चंद्रकांत गुडेवार यांनी मनपाच्या एकूणच यंत्रणेचे शुद्धीकरण सुरू केले. त्यामुळे भविष्यात अडचणीत येऊ शकणाऱ्या अधिकाऱ्यांनी सुटी स्वेच्छानिवृत्तीच्या नावाखाली आधीच कामकाजापासून फारकत घेतली. याशिवाय काही अधिकाऱ्यांना गुडेवार यांच्या ‘एफआयआर’ तंत्रामुळे माघारी फिरावे लागले. मनुष्यबळाचा तुटवडा हा तुटवडा दूर करण्यासाठीच आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी मनपात कंत्राटी भरती सुरू केली असून, अनुभवी व्यक्तींकडे महत्त्वाची पदे सोपवली आहेत. परिणामी, बांधकाम, विद्युत, एलबीटी आदी विभागांचा कारभार सुरळीत झाला असून, मनपाचे उत्पन्न वाढण्यासोबतच महत्त्वाची विकासकामेही पुढे जात आहेत.
अशी िवभागणी
कामामध्ये सुसूत्रता
मालमत्ता कराच्या फेररचनेत घरे, दुकाने, लॉज, हॉटेल्स, दवाखाने, मंगल कार्यालये, सरकारी निमसरकारी कार्यालये आदींचे मोजमाप सुरू आहेत. त्यामुळे कंत्राटदारांची बिले तपासण्यासाठीही स्वतंत्र यंत्रणा नेमावी लागली. विद्युत,बांधकाम विभागात अभियंत्यांअभावी अनेक कामे तुंबली आहेत.
सहा महिने मानधन तत्त्वावर नियुक्त ३० अभियंत्यांची विभागणीही निश्चित केली आहे. १५ अभियंते बांधकाम विभागात (शहर अभियंता), दहा रमाई घरकुल योजनेच्या कामासाठी तर उर्वरित पाच अभियंते विद्युत विभागात सेवा देणार आहेत.
नव्या अभियंत्यांच्या नियुक्तीमुळे कामामध्ये निश्चितच सुसूत्रता येईल. नवीन मनुष्यबळ कुशल असल्यामुळे विकासकामे पुढे जाण्यास मदत होईल. मनपाचा पर्यायाने शहराचा चेहरा-मोहरा बदलण्याचीच ही कसरत आहे आणि ‘स्मार्ट सिटी’साठी लागणारी मनुष्यबळाची गरजही त्यातून भागणार आहे. जीवनसदार, शहर अभियंता, मनपा, अम.