आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी मोडली ‘आरओबी’ ‘रमाई’ची एफडी!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- कर्मचाऱ्यांचेवेतन अदा करण्यासाठी प्रशासनाने आरओबी रमाई घरकुल योजनेची एफडी (मुदत ठेव) मोडली, असा आरोप शिवसेना नगरसेवक दिगंबर डहाके यांनी नुकत्याच घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला आहे. मात्र, हा रुटीन प्रकार असून, ती ‘कन्व्हर्टिबल कॅश’असते, असे प्रशासनाचे म्हणणे आहे.
डहाके म्हणाले, नगरोत्थानची लोकवर्गणी देण्यासाठी मनपाने दोन महिन्यांपूर्वी रमाई घरकुल योजनेची दहा कोटी रुपयांची एफडी तोडली, तर कुणाचीही मागणी नसताना कर्मचाऱ्यांना जून महिन्याचे वेतन देण्यासाठी राजापेठ रेल्वे उड्डाणपुलासाठी (आरओबी) शासनाने दिलेल्या दहा कोटी रुपयांतील नऊ कोटींचा वापर केला. त्यामुळे सध्या या दोन्ही हेडवर कोणतीही रक्कम शिल्लक नसून, ही बाब पूर्णत: नियमबाह्य असल्याची त्यांची मांडणी आहे. यासंदर्भात नगरसेवक म्हणून आपण काय केले, कुणाकडे तक्रार केली? चौकशीची मागणी केली का? अशा प्रश्नांवर मात्र ते फारसे भाष्य करू शकले नाही. परंतु, तुमच्या (वृत्तपत्रांच्या) माध्यमातून हा विषय चव्हाट्यावर आणायचा आहे, असे त्यांचे म्हणणे होते. दरम्यान, स्थायी समितीचे सदस्य या नात्याने आगामी बैठकीत भूमिका मांडू, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मनपा म्हणते, असे आहे वास्तव?
दरम्यान,एफडी मोडल्याच्या प्रकरणातील वास्तव िवशद करताना मनपाचे मुख्य लेखापाल शैलेंद्र गोसावी म्हणाले, पैसा इकडून तिकडे फिरवणे, ही िनत्याची (रुटीन) बाब अाहे. मात्र, असे करताना त्या रकमेची तजवीज आधीच करून घ्यावी लागते. सदर एफडीच्या बाबतही असेच घडले आहे. नगरोत्थान योजनेची लोकवर्गणीची ३० टक्के रक्कम भरण्यासाठी दोन महिन्यांआधी ‘रमाई’ची दहा कोटींची एफडी गहाण ठेवली होती. मात्र, दरम्यानच्या काळात ६७३ लाभार्थ्यांना रमाईची देयके (६.७३ कोटी) द्यायची असल्याने ती सोडवण्यासाठी ‘आरओबी’साठी जमा असलेले १० कोटी रुपये पर्यायी एफडी म्हणून द्यावे लागले.
‘आरओबी’चे काम थांबणार नाही
‘आरओबी’चीएफडी गहाण ठेवल्यामुळे राजापेठ रेल्वे उड्डाणपुलाचे काम प्रभावित होण्याचा प्रश्न अद्भूतत नाही. शिवाय, काम सुरू झाल्याबरोबर लगेच एवढी रक्कमही द्यावी लागत नाही.या रकमेची व्यवस्था लवकरच होणार असल्यामुळे घाबरण्याची काहीही गरज नाही. शैलेंद्रगोसावी, मुख्य लेखापाल, मनपा.