आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुदतीत दंड भरणाऱ्या हॉटेल्सवर थेट कारवाई

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- विशिष्टमुदतीच्या आत दंड भरणाऱ्या हॉटेल विरुद्ध जप्तीची कारवाई करण्याचा इशारा महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी दिला आहे. दंड भरा नाही तर जप्तीच्या कारवाईला तयार राहा, अशी पत्रे संबंधित इमारतीच्या संचालकांना देण्यात आली आहेत.
कॅम्पस्थित हॉटेल महफिल इन, महफिल लॉन ग्रँड महफिल, नवाथे प्लॉटवरील रंगोली पर्ल, रहाटगाव येथील गौरी इन, रेल्वे स्टेशन चौकातील र्इगल रेस्टॉरंट आणि बसस्थानक रोडस्थित रामगिरी हॉटेलचे मोजमाप करून त्यातील विनापरवानगी बांधकामाचा अहवाल मनपाच्या नगररचना विभागाने अलीकडेच सादर केला आहे. बहुतेक हॉटेल्स लॉनमध्ये परवानगीपेक्षा अधिक बांधकाम करण्यात आल्याने आयुक्तांनी या सर्व इमारतींच्या मालकांना दंड भरून रीतसर बांधकाम परवानगी घेण्याची सूचना केली आहे. मात्र, अद्याप कुणीही दंड भरला नाही.
सर्वांनीच वेगवेगळी कारणे पुढे करीत दंड भरण्यास असमर्थता व्यक्त केली. त्यानंतर काही हॉटेल्समालकांनी सहायक आयुक्तांच्या दालनात अपील दाखल केले. अपिलादरम्यान त्या सर्वांची बाजू ऐकून घेण्यात आली. मोजमापाबद्दल असलेल्या तक्रारींचे िनरसनही करण्यात आले. परंतु, दंडाची रक्कम योग्य असल्यामुळे त्यात कोणताही बदल केला गेला नाही. परिणामी, महफिल रामगिरीच्या संचालकांनी आयुक्तांच्या दालनात द्वितीय अपील दाखल करण्याचा प्रयत्न चालवला. मात्र, तसे करण्यापूर्वी ५० ते ७५ टक्के रक्कम जमा करा, अशी अट आयुक्तांनी घातल्यामुळे कोणीही हे पाऊल उचलले नाही.
ग्रँड महफिलसह इन, लॉनला दिली नोटीस
महाराष्ट्रमहानगरपालिका अधिनियम १९४९ च्या प्रकरण आठमधील कलम ४२ ते ४९ नुसार महफिल इन, ग्रँड महफिल महफिल लॉनवर जप्तीची कारवाई केली जाईल, अशी सूचना आयुक्तांनी संबंधितांना दिली आहे. हॉटेलचे संचालक प्रवीण मुंदडा अमरनाथ बाळकृष्ण यांच्या नावे चार सप्टेंबरलाच या तिन्ही नोटीस रवाना झाल्या आहेत.
अपिलात जाण्याचा कालखंड संपला
सहायकआयुक्तांनी निश्चित केलेली कारवाई (अर्थात दंडाची रक्कम) मान्य नसल्यास सर्व इमारतधारकांना अायुक्तांच्या दालनात अपील दाखल करण्याची संधी होती. परंतु, कोणीही तसे केले नाही. सहायक आयुक्तांच्या आदेशानंतर सात दिवसांच्या आत असे करता येत होते. परंतु, आता तो कालखंडही संपला आहे.