आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आज सर्वपक्षीयांतर्फे अमरावती बंदचे आवाहन, फेर मतदान घेण्याची करण्यात येत आहे मागणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बंद संदर्भात आयोजित पत्रपरिषदेत खा. अडसूळ, शिवसेना महानगर प्रमुख सुनील खराटे उमेदवार - Divya Marathi
बंद संदर्भात आयोजित पत्रपरिषदेत खा. अडसूळ, शिवसेना महानगर प्रमुख सुनील खराटे उमेदवार
अमरावती - महानगरपालिका, जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत इव्हीएम मशिनद्वारे मतदानात झालेल्या गैरप्रकाराच्या निषेधार्थ आज (दि.२७ फेब्रु.) सर्वपक्षीय बंदचे आवाहन करण्यात आले आहे. हा बंद शांततेच्या मार्गाने केला जाणार असल्याची माहिती सायंकाळी श्रमिक पत्रकार भवन येथे आयोजित पत्रपरिषदेत शिवसेना नेते खा. आनंद अडसुळ, महानगर प्रमुख सुनील खराटे यांनी दिली.
 
नुकत्याच झालेल्या मनपा, जिप आणि पंस निवडणुकीत इव्हीएम मशिनद्वारे झालेल्या मतदानात प्रचंड घोळ झाला आहे. या मशिनमध्ये मतांचा मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार झाल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे त्यामुळे विशिष्ट पक्षाचे जे उमेदवार पराभूत होण्याची शक्यता होती ते विजयी झाले आहेत. तर ज्यांच्या विजयी होण्याची शक्यता जास्त होती ते पराभूत झाले आहेत. निकालादरम्यान असंख्य तक्रारी मिळाल्या असताना सर्व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी या गंभीर प्रकाराकडे दुर्लक्ष केले. या मतदान प्रक्रियेसाठी शासन, प्रशासन संबंधित सर्व पदाधिकारी जबाबदार आहेत, असा ठपकाही सर्वपक्षीय पत्रपरिषदेत ठेवण्यात आला. 
उदाहरणार्थ इव्हीएम मशीनच्या सीयू अर्थात काऊंटिंग युनिटमध्ये जसे प्रोग्राम सेट केले तसाच निकाल बाहेर येईल. एखाद्या निवडणूक क्षेत्रात ८०० मतदार आहेत एक ते दहा हे उमेदवार निवडणुकीत उभे आहेत. त्यापैकी पाचव्या क्रमांकाच्या उमेदवाराला निवडून आणायचे असेल तर १०० पर्यंत मतदान झाल्यानंतर कोणत्याही उमेदवाराला मिळणारी मत पाचव्या क्रमांकाच्या उमेदवाराला मिळतील, असा प्रोग्राम सेट केले जाऊ शकते. तोच उमेदवार विजयी होईल. असे प्रोग्रामिंग केले असल्याने सत्ताधारी पक्षाचेच सर्वाधिक उमेदवार विजयी झाले. त्यामुळे जुनीच पद्धत मतपत्रिका शिक्का याचा वापर करून फेर मतदान घेण्यात यावे, अशी मागणी पत्रपरिषदेत सर्वपक्षीय नेत्यांनी केली. याप्रसंगी खा. आनंद अडसूळ, शिवसेना महानगर प्रमुख सुनील खराटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष बाबा राठोड, जितू ठाकूर, अॅड. शोएब खान, प्रशांत वानखडे, अविनाश मार्डीकर, मनिषा टेंभरे, शेख अकबर, इमरान अशरफी, प्रशांत वानखडे उपस्थित होते. 
 
बातम्या आणखी आहेत...