आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घनकचरा व्यवस्थापन पुन्हा सापडले वांध्यात, महापालिका नव्याने राबविणार निविदा प्रक्रिया

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - शहरातील घनकचरा व्यवस्थापन पुन्हा वांध्यात आल्याचे दिसून येत आहे. कोअर प्रोजेक्टने नकार दिल्याने घनकचरा व्यवस्थापन प्रक्रियेबाबत पुन्हा नव्याने निविदा प्रक्रिया राबविण्याची वेळ महापालिकेवर आली आहे. घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प लांबणीवर पडत असल्याने सुकळी येथील कंपोस्ट डेपोवर कचऱ्याचे ढिगारे जमा होत अाहे. 
 
महापालिका क्षेत्रातून दररोज २०० ते २५० टन घनकचरा गोळा होतो. घरा-घरातून गोळा झालेला मोठ्या प्रमाणात घनकचरा सुकळी येथील कंपाेस्ट डेपो येथे जमा केल्या जाते. शहरातून दररोज निघणाऱ्या घनकचऱ्यावर प्रक्रिया होणे बंधनकारक आहे. 

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाने देखील या विषयाला घेऊन महापालिकेला अनेकदा नोटीस बजाविल्या आहे. प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या नोटीसची दखल घेत घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प सुरू करण्याची प्रक्रिया राबविण्यात आली होती. सुकळी कंपोस्ट डेपो येथील घनकचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी काेअर प्रोजेक्ट या कंपनीची निविदा प्रक्रियेद्वारे निवड करण्यात आली होती. स्थायी समितीने मंजूरी दिल्यानंतर कंपनीसोबत वर्क ऑर्डर करणे बाकी असताना भारतीय जनता पक्षाचे विद्यमान आमदार डॉ. सुनील देशमुख यांच्या तत्कालीन जनविकास काँग्रेसचे नगरसेवक राजू मसराम यांच्याकडून या प्रकल्पाचा विरोध करीत शासनाकडे तक्रार करण्यात आली होती. 
 
माजी नगरसेवक शहरातील प्रदूषणाची भीषण समस्या निकाली निघावी म्हणून प्रकल्प सुरू होणे गरजेचे होते. मात्र विद्यमान अामदार डाॅ. सुनील देशमुख यांच्या तत्कालीन समर्थक राजू मसराम यांनी केलेल्या तक्रारीमुळे प्रदूषणाची समस्या वाढण्याची स्थिती निर्माण झाली आहे. निविदा प्रक्रियेचा कालावधी संपुष्टात आल्याने कोअर प्रोजेक्टने प्रकल्प करण्यास असहमती दर्शविली. शहरात जागो जागी डॅम्पींग ग्राऊंड निर्माण होत असल्याने दिव्य मराठीने घनकचऱ्याची समस्या भीषण झाल्याचे वास्तव समोर आणले. याची दखल घेत महापौर संजय नरवणे यांच्या अध्यक्षतेखाली आज (८ सप्टेंबर) महापालिकेत बैठक घेण्यात आली. घनकचरा प्रकल्प कार्यान्वित करण्याच्या अनुषंगाने चर्चा करण्यात आली. बैठकीत निविदा प्रक्रिया राबविण्याबाबत निर्णयाबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली. 

बैठकीला उपमहापौर संध्या टिकले, स्थायी समिती सभापती तूषार भारतीय, आयुक्त हेमंत पवार, पक्षनेता सुनील काळे, विरोधी पक्षनेता बबलू शेखावत, गटनेता प्रशांत वानखडे, चेतन पवार, अब्दूल नजीम अब्दूल रऊफ, नगरसेवक मिलिंद चिमोटे, विलास इंगोले, प्रकाश बनसोड, अजय गोंडाणे, उपायुक्त महेश देशमुख, नरेंद्र वानखडे, सहाय्यक संचालक नगर रचना सुरेंद्र कांबळे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डाॅ. अजय जाधव, अतिक्रमण विभाग प्रमुख गणेश कुत्तरमारे, डॉ. अजय जाधव, जनसंपर्क अधिकारी भूषण पुसतकर उपस्थित होते. 
बातम्या आणखी आहेत...