आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्तम खेळाडू घडवण्यासाठी क्रीडा शिक्षकांना प्रशिक्षण, खेळाडूंंना मिळेल संधी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संग्रहित, 5 मार्चपर्यंत विविध खेळांसह योगाचे देण्यात येणार जिल्हा स्टेडियमवर प्रशिक्षण - Divya Marathi
संग्रहित, 5 मार्चपर्यंत विविध खेळांसह योगाचे देण्यात येणार जिल्हा स्टेडियमवर प्रशिक्षण
अमरावती - राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक गाजवणारे शहरासह जिल्ह्यातून उत्तम खेळाडू घडावेत या उद्देशाने राज्य शासनाने महत्त्वाकांक्षी उपक्रम सुरू केला असून यां अंतर्गतच सध्या अमरावती जिल्ह्यातील क्रीडा शिक्षकांना २४ फेब्रु ते मार्च या १० दिवसांच्या कालावधीत विविध खेळांसह योगांचे पं.जवाहरलाल नेहरू जिल्हा स्टेडियमवर सकाळ सायंकाळच्या सत्रात प्रशिक्षण दिले जात आहे. 
 
शासनाच्या या उपक्रमाचे आयोजन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे जिल्हा स्टेडियमवर करण्यात आले असून उद्घाटन डीएसओ गणेश जाधव यांच्या हस्ते झाले. संपूर्ण जिल्ह्यातील १०० क्रीडा शिक्षक हँडबॉल, बास्केटबॉल, व्हाॅलीबाॅल, कबड्डी, खो-खो, लंगडी, चाॅकबाॅल, फुटबाॅल टेनिस तसेच अन्य काही खेळांचे प्रशिक्षण घेत आहेत. या शिक्षकांना खेळांच्या नविन नियमांची माहिती व्हावी खेळाडूंना त्यांनी नव्या नियमांप्रमाणे प्रशिक्षण द्यावे, यासह जिल्हा राज्यात दर्जेदार खेळाडू घडावेत हाच यामागील मुख्य उद्देश आहे. 

दोन सत्रात हे प्रशिक्षण सुरू असून सकाळी ते १० आणि सायं. ते असे प्रशिक्षण दिले जात आहे. यासाठी प्रत्येकी ५० शिक्षकांचे असे दोन गट पाडण्यात आले असून दोन वेगवेगळ्या तासिकांचे ही आयोजन करण्यात आले आहे. एका गटाचा तास संपला की तो दुसऱ्या तासिकेला उपस्थित राहतो. प्रशिक्षणाची सुरुवात राेज सकाळी योगतज्ज्ञ राजू देशमुख यांच्या योग प्रशिक्षणाद्वारे होते. त्यानंतर हलका व्यायाम एक्सरसाईज. त्यानंतर तज्ज्ञ या क्रीडा शिक्षकांना मार्गदर्शन करीत असतात. याअंतर्गत श्रीकृष्ण ठाकरे यांच्यासह पंकज वसाळकर यांनी क्रीडा मानसशास्त्र या विषयावर मार्गदर्शन केले. २८ रोजी शहर वाहतूक निरीक्षक अर्जुन ठोसरे वाहतुकीचे नियम समजावून सांगतिल, मार्च रोजी पंकज ठाकूर अभिनयातून व्यक्तिमत्व विकास, मार्च रोजी डाॅ. अविनाश मोहरील आदर्श शारीरिक शिक्षक, मार्च रोजी डाॅ. अरुण ठाकरे आयकर विवरण, मार्च रोजी प्रा. रवि साहू क्रीडा व्यवस्थापन, मार्च रोजी पोदार इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य सुधीर महाजन मार्गदर्शन करतील. 
याद्वारे क्रीडा शिक्षकांनाच खेळांच्या ज्ञानात अद्ययावत करून दर्जेदार खेळाडूंची फळी जिल्ह्यासह राज्यात घडवण्याचा विडा राज्य शासनाने उचलला आहे. 

आधी निवडक क्रीडा शिक्षकांना बालेवाडी येथे देण्यात आले प्रशिक्षण 
राज्य शासनाच्या क्रीडा युवक सेवा संचालनालयाने क्रीडा स्पर्धांच्या आयोजनात सक्रीय असलेल्या सर्वच जिल्ह्यातील निवडक शिक्षकांना आधी पुण्याच्या बालेवाडी क्रीडा संकुलात देशातील तज्ज्ञांकरवी १५ िदवस प्रशिक्षण िदले. आता हे क्रीडा शिक्षक जिल्ह्यातील क्रीडा शिक्षकांना प्रशिक्षित करीत आहेत. यात डाॅ. नितीन चव्हाळे, श्रीकांत देशमुख, राजेंद्र इंगळे, नाकील, चोपडे, शिवदत्त ढवळे, संदीप इंगोले, महेश अलोणे, मंगेश व्यवहारे, गवई, सहायक क्रीडा शिक्षक अजय आळशी, संतोष अरोरा, संदेश गिरी, अजय केवाळे, विजय मानकर यांचा समावेश आहे. 
 
दहा दिवस वेगवेगळ्या विषयांवर मार्गदर्शन 
जिल्ह्यातील १०० क्रीडा शिक्षकांना खेळ, योगासनांसह नवीन नियम, वाहतुकीचे नियम, व्यक्तिमत्व विकास, आदर्श शारीरिक शिक्षक, आयकर विवरण, क्रीडा व्यवस्थापन, मैदानांची काळजी, खेळाडूंना जाणून घेण्याची लकब, विद्यार्थ्यांशी संवाद अशा वेगवेगळ्या विषयांवर तज्ज्ञांचे मार्गदर्शनही मिळत आहे. या खेळाडूंनी देशासाठी शाळेत उत्तम पिढी घडवावी. त्या माध्यमातून देशाला उत्तम खेळाडू नागरिक मिळतील, हाच यामागील मुख्य उद्देश आहे. 
 
बातम्या आणखी आहेत...